Today's Picks

Most Recent

शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी देवगड निपाणी मार्ग रोखला

- शिरगाव बाजारपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी - चौकेवाडी शाळेत शिक्षक देण्याची मागणी अधांतरी संतोष साळसकर | सहसंपादक : देवगड तालुक्यातील शिरगाव चौकेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या मागणीचा...

Most Recent

Trending

Important

रेशन दुकानावर प्लास्टीक सदृश्य तांदूळ असल्याची शक्यता ; पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली सखोल परिक्षण, तपासणी व चौकशीची मागणी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील रेशन दुकानावर धान्य वितरणातील तांदूळ हे प्लास्टीक सदृश्य असल्याचे आढळल्याचा दावा माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केला आहे. चंद्रकांत गोलतकर ( माजी सरपंच, पळसंब) पळसंब रेशनिंग दुकानावर देण्यात आलेले तांदूळ धान्य हे प्लॉस्टिक सदृश्य असल्याचे आढळत असून ते मानवी जीवनासाठी हानिकारक असल्याने रेशनिंग दुकानांची तपासणी करून, तांदूळ परीक्षण करुन सखोल चौकशी करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे

कणकवली विद्यामंदिरच्या मुलांनी दिवीजा आश्रमातील ज्येष्ठांसोबत साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी ; उपक्रमाची होत आहे प्रशंसा.

कासार्डे | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वस्तिक फाऊंडेशनच्या असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात भेट देउन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली. विद्यामंदिर शाळेतील शिक्षक प्रसाद राणे व शिक्षिका सौं. शर्मिष्ठा केळुस्कर यांनी विद्याथ्यांना दिविजा वृद्धाश्रमात नेंउन प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला. या उपक्रमानिमित्त या विद्यार्थ्यांनी या वृध्दाश्रमातील आजी आजोबासाठी भेट कार्ड बनवून आणली, काही विद्यार्थीनी गीते सादर केली तर काहींनी फराळ व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी प्रसाद राणे यांनी आश्रम संकल्पना काय असतें ह्या विषयी माहिती विद्यार्थीना दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी आजी आजोबांचे पाद्य पुजन्न करून ओवाळनी केली. एक उत्तम संस्कार शिक्षकांनी या विद्यार्थ्याना यानिमित्ताने आश्रमात शिकवला. तर यावेळी दिविजा वृद्धाश्रमाच्या संचालकांनी आश्रमाची माहिती विद्यार्थीना दिली. आजी आजोबांना नातवंडे भेटायला आल्यामुळे खूप...

More from categories

error: Content is protected !!