मसुरे | प्रतिनिधी : देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्याने मसुरे देऊळवाडा जि. प. प्राथमिक शाळेच्या विध्यार्थ्यानी काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत, श्री देव विठ्ठलाचा सहभाग विशेष आकर्षण ठरले.
सर्व मुलांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा करत वातावरण निर्मिती केली होती. यावेळी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रशांत पारकर, गुरुनाथ ताम्हणकर, सौ तेजल ताम्हणकर व सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.