27.5 C
Mālvan
Saturday, July 27, 2024
IMG-20240531-WA0007

राजेंद्र नामा..! ( २० डिसेंबर )

- Advertisement -
- Advertisement -

नमस्कार सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बंधू भगिनींनो. मी राजेंद्र मनोहर पेडणेकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील रहिवासी व एक सर्वसामान्य मध्यम व्यावसायिक. गेली ४० वर्षे मी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये यथाशक्ती कार्यरत रहायचा प्रयत्न केलेला आहे आणि या दरम्यान होणारी राजकीय स्थित्यंतरे व राजकारणाची बदलती व्याख्या मी जवळून पहात आलेलो आहे स्वतःचे हीत साधणे किंवा प्रगती करणे यासाठी दुसर्या बद्दलचे वाईट दाखवणे, रचणे किंवा सांगणे ही माझी वैयक्तिक वृत्ती नसल्याने केवळ बदलत्या राजकीय पटलावर आपण काय करु शकतो याविषयी पुढील काही दिवस मी तुमच्याशी सविस्तर बोलू इच्छितो म्हणून हा ‘राजेंद्र नामा’ आहे. गेल्याच आठवड्या मध्ये जेंव्हा माझी राजकीय प्रवेश व निवडणुकीला उभे रहायची घोषणा केली गेली तेंव्हा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो बंधू भगिनींनी मला प्रत्यक्ष, फोन द्वारे आणि संदेशाद्वारे आनंदाने शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आधी त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो.

आज निवडणूक लढवाविशी वाटणे यामागे जरी ४० वर्षांचा समाजसेवेचा अनुभव असला तरी आपल्या कोकणातील मूळ मुद्द्यांवर नेमके बोलले जात नाही आणि त्यांचे निराकरण न करता इतर कुठलेतरी वैयक्तिक किंवा पक्षीय मुद्दे घुसडून लोकांची दिशा भरकटवण्याचे जे प्रयत्न आहेत त्यासाठी मला निवडणूक हा महत्वाचा आधार वाटतो. समाजसेवेचा महासागर हा प्रचंड न संपणारा असतो परंतु राजकारण हे संविधानाने अचूक आखलेल्या जल प्रणाली सारखे आहे जिच्या मध्ये जर स्वच्छता राखत देखभाल सांभाळली गेली तर ती जल प्रणाली अत्यंत उत्तम काम करेल. जनतेच्या कल्याणासाठी उपलब्ध असणार्या लोकशाहीच्या पाईपलाईनला ‘चोक अप’ करणार्या घटकांची व वृत्तींची जिथल्या तिथे विल्हेवाट लावली तर लोकशाहीत व पर्यायाने आपापल्या क्षेत्रामध्ये शांतता, सुव्यवस्था व प्रगती ही आपसूक घडत राहील.

गेली ३० वर्षे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प जरूर मार्गी लागले आहेत परंतु ते इथल्याच मातीमुळे, इथल्याच नैसर्गिक संसाधनांमुळे व इथल्याच माणसांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहेत याचा राजकिय व्यक्ती व शक्तींना विसर पडतो याची खंत आहे. निवडणूक ही जनकल्याणाची एक चावी आहे. निवडणूक जिंकली की लोकप्रतिनिधीचा विजय होतो ही भावना व संकल्पना सर्वतोपरी चुकीच्या पद्धतीने विविध सोहळे, बॅनरबाजी यातून जनतेसमोर दाखवली जाते. खरेतर निवडणूक जिंकली की लोकप्रतिनिधींचा खरा अभ्यास सुरु होतो ही साधी गोष्ट लोकप्रतिनिधी व त्यांच्या पाठिराख्यांना लक्षात येत नाही हेच लोकशाहीच्या खच्चीकरणाचे कारण आहे. संविधानाने दिलेली पदे ही लोकांसाठी आहेत …पक्षांसाठी नाहीत याकडे आज सोयीस्कर दुर्लक्ष करुन स्वतःच्या पक्षाला जोपासायच्या नादात लोकांचे साधे साधे प्रश्न लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळींना ध्यानातच येत नाही आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘रोजगार, पर्यावरण, आरोग्य, मुलभूत सोयी’ यावर कोणीतरी आंदोलनात्मक उठाव’ करत असतातच त्यांचे कौतुक आहे परंतु त्या आंदोलनातून काय निष्पन्न होते याबद्दल मिडिया, तथाकथित समाजसेवक लोकप्रतिनिधी चकार शब्द काढत नसतात. १०० आंदोलनांमागे एखाद्या ठिकाणी जनतेला न्याय मिळतो व तो मिळाला की जनतेवरच उपकार केल्यासारखे फोटो काढून त्याचा पुन्हा एक वेगळाच बाजार होतो आहे ही आजच्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे.

मी समाजकार्य हे अथांग आहे हे सांगताना त्यासोबत ‘चांगल्या राजकारणाची सांगड’ ही लोकशाहीचे सूत्र असल्याचे मानतो म्हणून निवडणूक लढविण्याचा विचार पूर्णत्वाला नेणार आहे. परखड व स्पष्ट बोलणे म्हणजे लोकांची मनं दुखवत फिरणे नसते तर आपल्या सामाजिक यंत्रणेची नीगा राखायसाठी झटणे हेच परखड पणे वागणे असते. पुढील काही दिवस तुमच्याशी मनमोकळेपणाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अत्यावश्यक प्रश्न, समस्या, मजबूत बाजू व त्या मजबूत बाजुंना कमकुवत करू पहाणार्या बाजुंबद्दल बोलेन. ‘हवेत बार व तीन ठार’अशी लुच्ची व दुसर्याने काहीतरी करायची वृत्ती आपल्या लक्षात येत असते परंतु आपण ती दुर्लक्षित करतो तसेच राजकीय बाबतीतही आपल्याला खटकलेल्या वृत्तींबाबत आपण उदासीन राहून चालणार नाही. निव्वळ तात्पुरते झगमगाट व कृत्रिम बदल किंवा परिवर्तन म्हणजे क्रांती नाही तर जनसामान्यांना सुखसोयी, राबणार्या हातांना काम व योग्य दाम, सुशिक्षण, सांस्कृतिक आनंद, मातृभूमीची काळजी घेणे, अध्यात्मिक सक्षमिकरण व निरोगी जीवन उपलब्ध होणे ही खरी क्रांती असेल.

तुमचे स्नेह, विश्वास याबद्दल धन्यवाद व लोकशाहीवरील आपल्या सर्वांचा विश्वास हा आपापल्या कृतीतून घट्ट होत राहो या सदिच्छा.

राजेंद्र मनोहर पेडणेकर. ( सिंधुदुर्ग )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नमस्कार सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बंधू भगिनींनो. मी राजेंद्र मनोहर पेडणेकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील रहिवासी व एक सर्वसामान्य मध्यम व्यावसायिक. गेली ४० वर्षे मी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये यथाशक्ती कार्यरत रहायचा प्रयत्न केलेला आहे आणि या दरम्यान होणारी राजकीय स्थित्यंतरे व राजकारणाची बदलती व्याख्या मी जवळून पहात आलेलो आहे स्वतःचे हीत साधणे किंवा प्रगती करणे यासाठी दुसर्या बद्दलचे वाईट दाखवणे, रचणे किंवा सांगणे ही माझी वैयक्तिक वृत्ती नसल्याने केवळ बदलत्या राजकीय पटलावर आपण काय करु शकतो याविषयी पुढील काही दिवस मी तुमच्याशी सविस्तर बोलू इच्छितो म्हणून हा 'राजेंद्र नामा' आहे. गेल्याच आठवड्या मध्ये जेंव्हा माझी राजकीय प्रवेश व निवडणुकीला उभे रहायची घोषणा केली गेली तेंव्हा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो बंधू भगिनींनी मला प्रत्यक्ष, फोन द्वारे आणि संदेशाद्वारे आनंदाने शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आधी त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो.

आज निवडणूक लढवाविशी वाटणे यामागे जरी ४० वर्षांचा समाजसेवेचा अनुभव असला तरी आपल्या कोकणातील मूळ मुद्द्यांवर नेमके बोलले जात नाही आणि त्यांचे निराकरण न करता इतर कुठलेतरी वैयक्तिक किंवा पक्षीय मुद्दे घुसडून लोकांची दिशा भरकटवण्याचे जे प्रयत्न आहेत त्यासाठी मला निवडणूक हा महत्वाचा आधार वाटतो. समाजसेवेचा महासागर हा प्रचंड न संपणारा असतो परंतु राजकारण हे संविधानाने अचूक आखलेल्या जल प्रणाली सारखे आहे जिच्या मध्ये जर स्वच्छता राखत देखभाल सांभाळली गेली तर ती जल प्रणाली अत्यंत उत्तम काम करेल. जनतेच्या कल्याणासाठी उपलब्ध असणार्या लोकशाहीच्या पाईपलाईनला 'चोक अप' करणार्या घटकांची व वृत्तींची जिथल्या तिथे विल्हेवाट लावली तर लोकशाहीत व पर्यायाने आपापल्या क्षेत्रामध्ये शांतता, सुव्यवस्था व प्रगती ही आपसूक घडत राहील.

गेली ३० वर्षे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प जरूर मार्गी लागले आहेत परंतु ते इथल्याच मातीमुळे, इथल्याच नैसर्गिक संसाधनांमुळे व इथल्याच माणसांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहेत याचा राजकिय व्यक्ती व शक्तींना विसर पडतो याची खंत आहे. निवडणूक ही जनकल्याणाची एक चावी आहे. निवडणूक जिंकली की लोकप्रतिनिधीचा विजय होतो ही भावना व संकल्पना सर्वतोपरी चुकीच्या पद्धतीने विविध सोहळे, बॅनरबाजी यातून जनतेसमोर दाखवली जाते. खरेतर निवडणूक जिंकली की लोकप्रतिनिधींचा खरा अभ्यास सुरु होतो ही साधी गोष्ट लोकप्रतिनिधी व त्यांच्या पाठिराख्यांना लक्षात येत नाही हेच लोकशाहीच्या खच्चीकरणाचे कारण आहे. संविधानाने दिलेली पदे ही लोकांसाठी आहेत …पक्षांसाठी नाहीत याकडे आज सोयीस्कर दुर्लक्ष करुन स्वतःच्या पक्षाला जोपासायच्या नादात लोकांचे साधे साधे प्रश्न लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळींना ध्यानातच येत नाही आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'रोजगार, पर्यावरण, आरोग्य, मुलभूत सोयी' यावर कोणीतरी आंदोलनात्मक उठाव' करत असतातच त्यांचे कौतुक आहे परंतु त्या आंदोलनातून काय निष्पन्न होते याबद्दल मिडिया, तथाकथित समाजसेवक लोकप्रतिनिधी चकार शब्द काढत नसतात. १०० आंदोलनांमागे एखाद्या ठिकाणी जनतेला न्याय मिळतो व तो मिळाला की जनतेवरच उपकार केल्यासारखे फोटो काढून त्याचा पुन्हा एक वेगळाच बाजार होतो आहे ही आजच्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे.

मी समाजकार्य हे अथांग आहे हे सांगताना त्यासोबत 'चांगल्या राजकारणाची सांगड' ही लोकशाहीचे सूत्र असल्याचे मानतो म्हणून निवडणूक लढविण्याचा विचार पूर्णत्वाला नेणार आहे. परखड व स्पष्ट बोलणे म्हणजे लोकांची मनं दुखवत फिरणे नसते तर आपल्या सामाजिक यंत्रणेची नीगा राखायसाठी झटणे हेच परखड पणे वागणे असते. पुढील काही दिवस तुमच्याशी मनमोकळेपणाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अत्यावश्यक प्रश्न, समस्या, मजबूत बाजू व त्या मजबूत बाजुंना कमकुवत करू पहाणार्या बाजुंबद्दल बोलेन. 'हवेत बार व तीन ठार'अशी लुच्ची व दुसर्याने काहीतरी करायची वृत्ती आपल्या लक्षात येत असते परंतु आपण ती दुर्लक्षित करतो तसेच राजकीय बाबतीतही आपल्याला खटकलेल्या वृत्तींबाबत आपण उदासीन राहून चालणार नाही. निव्वळ तात्पुरते झगमगाट व कृत्रिम बदल किंवा परिवर्तन म्हणजे क्रांती नाही तर जनसामान्यांना सुखसोयी, राबणार्या हातांना काम व योग्य दाम, सुशिक्षण, सांस्कृतिक आनंद, मातृभूमीची काळजी घेणे, अध्यात्मिक सक्षमिकरण व निरोगी जीवन उपलब्ध होणे ही खरी क्रांती असेल.

तुमचे स्नेह, विश्वास याबद्दल धन्यवाद व लोकशाहीवरील आपल्या सर्वांचा विश्वास हा आपापल्या कृतीतून घट्ट होत राहो या सदिच्छा.

राजेंद्र मनोहर पेडणेकर. ( सिंधुदुर्ग )

error: Content is protected !!