मुंबई | ब्युरो न्यूज : रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून ही सहाव्यांदा वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बजेट आणि यू.एस. फेडने वाढवलेल्या व्याजदरानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था सध्या बरी असल्याचं म्हटले आहे. जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट असताना भारताची स्थिती त्या तुलनेत ठीक आहे आणि महागाईवर अंशत: नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.
मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील रिझर्व्ह बँकने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आता रिझर्व्ह बँकने ०:२५ आधारभूत गुणांनी रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनलोन महाग होणार आहेत.