मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे मच्छिमार नेते श्री. पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी राज्य सरकारला एका प्रसिद्धी पत्राद्वारे टीका सवाल केले आहेत.
प्रसिद्धी पत्रात नेते बाबी जोगी यांनी सवाल केला आहे की, सध्याचे राज्य सरकार म्हणजे शिंदे सरकार हे एकट्या अनिल अंबानी यांच्या वरती मेहरबान आहे का आणि या सरकारला कर्जमाफीसाठी मच्छीमार शेतकरी दिसला नाही का? बड्या उद्योजकांना कर्जात माफी दिलेल्या त्या सतराशे कोटीं मध्ये कित्येक सामान्य मच्छिमार शेतकरी व बागायतदार यांचे कर्ज फिटले असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमाऱ, शेतकरी व बागायतदार यांच्या हाल अपेष्टा सरकारला दिसत नाहीत अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
बाबी जोगी यांनी सांगितले आहे की ट्राॅलर / बोट बांधण्यासाठी सात लोकांच्या ग्रुपने घेतलेले. मच्छी व्यवसायातील कमी उत्पन्नामुळे हे एनसीडीसी कर्ज ते मच्छिमार फेडू शकलेले नाहीत. ते कर्ज ह्या रकमे पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. आज त्या बोटींचे ड्युटी लाईफ संपून त्या नष्ट सुद्धा झाल्या आहेत. त्यामुळे मच्छीमार कर्ज फेडू शकत नाहीत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांचे भयानक वास्तव आहे. आपल्या माथ्यावर लाखांत कर्ज असल्यामुळे मच्छिमार व त्याच्या आगतीक कुटुंबाला आपल्या मुलाबाळाची घरादारांची कायम चिंता वाटत आहे. शासन ह्या मच्छीमाऱ्यांच्या सातबारा वरती बोजा चढवायच्या प्रयत्न करत आहे असा आरोप देखील बाबी जोगी यांनी केला आहे.
अशा ह्या हजारो शेतकरी ,मच्छिमार, बागायतदार यांचे दुःख समजून घेऊन त्यांचे कर्ज माफ करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवायचे सोडून अनिल अंबानींना कर्जमाफी देणे म्हणजे सरकार जनतेचे की अंबानी सारख्या उद्योगपतींचे, असा सवाल मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी केला आहे.