मसुरे | प्रतिनिधी : श्रीमती मनोरमा चौधरी यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमित्त वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुर येथे, विद्यार्थ्यांकरीता चित्रभरण स्पर्धा, दंत चिकित्सा व नेत्र चिकित्सा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यातील रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रंगभरण चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटात कु. वेदांत सचिन तवटे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांत हा श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या कला शिक्षिका सौ गौरी तवटे व जि. प. शिक्षक सचिन तवटे यांचा मुलगा आहे.
या स्पर्धेत देवगड ते दोडामार्ग पर्यंतच्या १५७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते श्रीम. मनोरमा चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, नेरुरच्या प्रथम नागरिक भक्ती घाडीगांवकर, वसुंधरा केंद्राचे व्यवस्थापक सतीश नाईक, डॉक्टर मयुरी ठाकूर, डॉक्टर जोशी, सिंधुदुर्ग न्यायालयाचे निवृत्त अधिक्षक मठकर व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील राजकीय नेते श्री. अमित सामंत व श्री. काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.