27.8 C
Mālvan
Monday, December 2, 2024
IMG-20240531-WA0007

वैचारीक ध्रुवीकरण स्वाभाविक आहे परंतु सामाजिक ध्रुवीकरण गुन्हा आहे..! ( राजेंद्र नामा )

- Advertisement -
- Advertisement -

२८ डिसेंबर २०२३ : नमस्कार बंधू भगिनींनो. मी तुमचाच म्हणजे अढळ ध्रुवीय सामाजिक जाणिवेतून समाजकारणाची कास धरुन येत्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा आगामी उमेदवार राजेंद्र मनोहर पेडणेकर. आपल्या मागील संवादामध्ये मी आपणास विनम्रपणे व प्रांजळपणे माझ्या राजकीय निवडणूक प्रवेशाबद्दल कल्पना दिलेली आहेच.आता त्या दरम्यान ज्या काही प्रमुख ‘सामाजिक अडसर’ ठरणार्या समस्या आहेत त्यावर आपण थोडा प्रकाश टाकून बघुया हा आजच्या ‘राजेंद्र नामा’ चा उद्देश आहेः.

‘वैचारिक ध्रुवीकरण’ हा मानवाच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनाचा एक स्वाभाविक भाग आहे हे आपण मान्य करतो. परंतु गेल्या २० वर्षांत भारतामधील ‘सामाजिक ध्रुवीकरण’ हे वास्तव आता उघडपणे मांडणे भीतीदायक ठरते आहे. ते कोणी मांडू पाहिले तर त्याला एकतर अलिखितपणाने वाळीत टाकले जाणे किंवा सत्ताधारी घटकांकडून त्याच्या मागे कायद्याचा ससेमीरा लागायची भीती सुद्धा निर्माण होते.यात कोणत्या एका पक्षाच्या सत्तेचा समावेश नाही तर प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, विधानसभा तसेच केंद्रीय स्तरावर हे थोड्या अधिक प्रमाणात घडते हे आता आपण गृहीतच धरुन चाललोय असे संविधाना बाहेरील नागरीकशास्त्र तयार होत आहे हीच सामाजिक ध्रुवीकरणाची मूळ बीजे आहेत.
सध्या वैचारिक मतभेदांनंतर एकाच तत्वामध्ये दोन कृत्रिम गट तयार करुन कौटुंबिक व सामाजिक स्तरावर अशक्तीकरणाची मोहीम राबवून काही स्वार्थी राजकीय शक्ती शिक्षण, अध्यात्म, आरोग्य, क्रीडा, अर्थ विभाग, कृषी विभाग, जलसंपदा, कचरा व्यवस्थापन अशा सगळ्या क्षेत्रात आपापली पोळी भाजून घेऊन सामान्य जनतेची व प्रामाणिक राजकीय तत्वांची उघड उघडा अवहेलना करत आहेत.

सामाजिक ध्रुवीकरण करायची प्रक्रिया ही खूप सोपी आहे. ‘फोडा व राज्य करा’ याच नीतीचा तो पुढचा अंक आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासासाठी कटीबद्धता दर्शविलेल्या अनेक व्यक्ती त्या ध्रुवीकरणाची शिकार बनत आहेत याची खंत आहे म्हणून मला व्यक्तिशः या राजकीय पटलावर निवडणूकीच्या माध्यमातून काहीतरी करायची मनिषा निर्माण झाली असावी. ४० वर्षांच्या सामाजिक वावरात अनेक चांगली राजकीय तळमळीची माणसे भेटली त्यांच्या कृती व विचारांचा परमार्श म्हणजे माझे राजकीय आचरण आहे व राहील याची मी जाहीर ग्वाही देतो.

शासकीय नोकर भरती या प्रकारातील ध्रुवीकरण ही खूप मोठी रोजगार विषयक समस्या आज कोकणासाठी घातक आहे. कसली भरती आहे, कुठे भरती आहे, निकष काय आहेत वगैरे माहिती फक्त ठरावीक राजकीय गटातील मंडळींपर्यंतच पोचत असते पण सरसकट सर्व जनतेपर्यंत पोचवणारी प्रणाली विकसीत केली जात नाही आहे. परिणामी एकाच कोणत्यातरी गटाचा ‘विकास’ होतो व गरजू हा आजन्म गरजू राहून जगतो. आरोग्य विभागातील लालफितीचे कारभार फक्त सामान्य व खासकरुन कनिष्ठ व मध्यमवर्गीय जनतेलाच सोसावे लागतात हे ध्रुवीकरण स्वाभाविक कसे काय असू शकते…?

आजचा ‘राजेंद्र नामा’ हा कृपया वर्तमानाचा आरसा समजू नये कारण आरसा उलटी प्रतिमा दाखवतो. आजचा ‘राजेंद्र नामा’ हे सद्य स्थितीचे एक छायाचित्र आहे असे समजा कारण छायाचित्रे जे आहेत तेच दाखवतात आणि त्यात जे छेडछाड व एडिटींग करतात त्या तत्वांनाच ‘सामाजिक ध्रुवीकरणाची’ केंद्रे समजा..!

सध्या सणासुदीचे, अध्यात्मिक उन्नतीचे व येऊ घातलेल्या नवीन वर्षाच्या स्वागताचे वातावरण आहे परंतु आपण सामाजिक ध्रुवीकरण करणारे रथ व त्यांच्या यांत्रांचे व्यक्ती उदात्तीकरण न करता उघड डोळ्याने ‘आपण सगळे भारतीय एक आहोत’ हे मनावर बिंबविले तरच आपले सर्वांगीण जीवन स्थीर होईल हे निश्चित.

पुढील ‘राजेंद्र नामा’ संवादात आणखीन मुद्द्यांवर बोलुया. आत्ता तुमची रजा घेतो …धन्यवाद. लक्षात असू द्या ,” वैचारीक ध्रुवीकरण स्वाभाविक आहे परंतु सामाजिक ध्रुवीकरण निश्चितच ‘गुन्हा आहे..!’

राजेंद्र मनोहर पेडणेकर ( सिंधुदुर्ग. )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

२८ डिसेंबर २०२३ : नमस्कार बंधू भगिनींनो. मी तुमचाच म्हणजे अढळ ध्रुवीय सामाजिक जाणिवेतून समाजकारणाची कास धरुन येत्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा आगामी उमेदवार राजेंद्र मनोहर पेडणेकर. आपल्या मागील संवादामध्ये मी आपणास विनम्रपणे व प्रांजळपणे माझ्या राजकीय निवडणूक प्रवेशाबद्दल कल्पना दिलेली आहेच.आता त्या दरम्यान ज्या काही प्रमुख 'सामाजिक अडसर' ठरणार्या समस्या आहेत त्यावर आपण थोडा प्रकाश टाकून बघुया हा आजच्या 'राजेंद्र नामा' चा उद्देश आहेः.

'वैचारिक ध्रुवीकरण' हा मानवाच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनाचा एक स्वाभाविक भाग आहे हे आपण मान्य करतो. परंतु गेल्या २० वर्षांत भारतामधील 'सामाजिक ध्रुवीकरण' हे वास्तव आता उघडपणे मांडणे भीतीदायक ठरते आहे. ते कोणी मांडू पाहिले तर त्याला एकतर अलिखितपणाने वाळीत टाकले जाणे किंवा सत्ताधारी घटकांकडून त्याच्या मागे कायद्याचा ससेमीरा लागायची भीती सुद्धा निर्माण होते.यात कोणत्या एका पक्षाच्या सत्तेचा समावेश नाही तर प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, विधानसभा तसेच केंद्रीय स्तरावर हे थोड्या अधिक प्रमाणात घडते हे आता आपण गृहीतच धरुन चाललोय असे संविधाना बाहेरील नागरीकशास्त्र तयार होत आहे हीच सामाजिक ध्रुवीकरणाची मूळ बीजे आहेत.
सध्या वैचारिक मतभेदांनंतर एकाच तत्वामध्ये दोन कृत्रिम गट तयार करुन कौटुंबिक व सामाजिक स्तरावर अशक्तीकरणाची मोहीम राबवून काही स्वार्थी राजकीय शक्ती शिक्षण, अध्यात्म, आरोग्य, क्रीडा, अर्थ विभाग, कृषी विभाग, जलसंपदा, कचरा व्यवस्थापन अशा सगळ्या क्षेत्रात आपापली पोळी भाजून घेऊन सामान्य जनतेची व प्रामाणिक राजकीय तत्वांची उघड उघडा अवहेलना करत आहेत.

सामाजिक ध्रुवीकरण करायची प्रक्रिया ही खूप सोपी आहे. 'फोडा व राज्य करा' याच नीतीचा तो पुढचा अंक आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासासाठी कटीबद्धता दर्शविलेल्या अनेक व्यक्ती त्या ध्रुवीकरणाची शिकार बनत आहेत याची खंत आहे म्हणून मला व्यक्तिशः या राजकीय पटलावर निवडणूकीच्या माध्यमातून काहीतरी करायची मनिषा निर्माण झाली असावी. ४० वर्षांच्या सामाजिक वावरात अनेक चांगली राजकीय तळमळीची माणसे भेटली त्यांच्या कृती व विचारांचा परमार्श म्हणजे माझे राजकीय आचरण आहे व राहील याची मी जाहीर ग्वाही देतो.

शासकीय नोकर भरती या प्रकारातील ध्रुवीकरण ही खूप मोठी रोजगार विषयक समस्या आज कोकणासाठी घातक आहे. कसली भरती आहे, कुठे भरती आहे, निकष काय आहेत वगैरे माहिती फक्त ठरावीक राजकीय गटातील मंडळींपर्यंतच पोचत असते पण सरसकट सर्व जनतेपर्यंत पोचवणारी प्रणाली विकसीत केली जात नाही आहे. परिणामी एकाच कोणत्यातरी गटाचा 'विकास' होतो व गरजू हा आजन्म गरजू राहून जगतो. आरोग्य विभागातील लालफितीचे कारभार फक्त सामान्य व खासकरुन कनिष्ठ व मध्यमवर्गीय जनतेलाच सोसावे लागतात हे ध्रुवीकरण स्वाभाविक कसे काय असू शकते…?

आजचा 'राजेंद्र नामा' हा कृपया वर्तमानाचा आरसा समजू नये कारण आरसा उलटी प्रतिमा दाखवतो. आजचा 'राजेंद्र नामा' हे सद्य स्थितीचे एक छायाचित्र आहे असे समजा कारण छायाचित्रे जे आहेत तेच दाखवतात आणि त्यात जे छेडछाड व एडिटींग करतात त्या तत्वांनाच 'सामाजिक ध्रुवीकरणाची' केंद्रे समजा..!

सध्या सणासुदीचे, अध्यात्मिक उन्नतीचे व येऊ घातलेल्या नवीन वर्षाच्या स्वागताचे वातावरण आहे परंतु आपण सामाजिक ध्रुवीकरण करणारे रथ व त्यांच्या यांत्रांचे व्यक्ती उदात्तीकरण न करता उघड डोळ्याने 'आपण सगळे भारतीय एक आहोत' हे मनावर बिंबविले तरच आपले सर्वांगीण जीवन स्थीर होईल हे निश्चित.

पुढील 'राजेंद्र नामा' संवादात आणखीन मुद्द्यांवर बोलुया. आत्ता तुमची रजा घेतो …धन्यवाद. लक्षात असू द्या ," वैचारीक ध्रुवीकरण स्वाभाविक आहे परंतु सामाजिक ध्रुवीकरण निश्चितच 'गुन्हा आहे..!'

राजेंद्र मनोहर पेडणेकर ( सिंधुदुर्ग. )

error: Content is protected !!