22.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सावंतवाडीत साजरा झाला ‘पदकोत्सव..!’

- Advertisement -
- Advertisement -

काॅम्रेड मॅरॅथाॅनचे पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचा जंगी सत्कार संपन्न.

सावंतवाडी संस्थान राजवाडा येथे बॅन्क्वेट हाॅलमधील विशेष कार्यक्रमात युवराज लखमराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी केला पदकवीरांवर अभिनंदनाचा वर्षाव.

सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : जगप्रसिद्ध अशा काॅम्रेड मॅरॅथॉन मध्ये, ९ जून २०२४ रोजी भारताचे प्रतिनिधित्व करुन जागतीक सन्मानाचे बिल रोवाॅन पदक आणि ब्राॅन्झ पदकांसह मायभूमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतलेले मॅरॅथॉन धावक श्री. प्रसाद कोरगांवकर व श्री. ओंकार पराडकर यांचा सावंतवाडीत जंगी सत्कार संपन्न झाला. शनिवारी १६ जून रोजी, सावंतवाडी संस्थान राजवाडा येथील बॅन्क्वेट हाॅलमध्ये सिंधु रनर्स, रांगणा रनर्स व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या संयुक्त सहभागाने हा विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. डाॅ. स्नेहल गोवेकर व डाॅ. प्रशांत मढव यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात काॅम्रेड मॅरॅथॉन पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांनी त्यांच्या मनोगता द्वारे संपूर्ण मॅरॅथॉन प्रवासाचे, त्यामागील घटकांचे आणि दोघांच्याही मॅरॅथाॅन क्षेत्रातील जीवनपटाचे कथन केले.

या कार्यक्रमात सुरवातीला डाॅ. प्रशांत मढव व डाॅ. स्नेहल गोवेकर यांनी या कार्यक्रमाचा विशेष उद्देश कथन केला आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन डाॅ. अनघा बोर्डवेकर यांनी प्रमुख उपस्थित मान्यवर युवराज लखमराजे भोसले व अन्य मान्यवरांना मंचावर आमंत्रित केले. यामध्ये पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धावक चळवळीचे आग्रही प्रोत्साहक अशी ओळख असलेले कुडाळ येथील डाॅ. जयसिंग राणे, तसेच ओंकार पराडकर यांचे वडिल श्री. दत्तात्रय पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचे वडिल श्री. लक्ष्मण कोरगांवकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे डाॅ. स्नेहल गोवेकर, डाॅ. प्रशांत मढव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमात ओंकार पराडकर यांचे वडिल व कुटुंबीय आणि प्रसाद कोरगांवकर यांचे आई वडिल यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या मनोगतामध्ये डाॅ. जयसिंह रावराणे यांनी ओंकार व प्रसाद यांच्या काॅम्रेड मॅरॅथॉनधील आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल त्यांची प्रशंसा करावी तितकी कमीच असल्याचे सांगितले. डाॅ. प्रशांत मढव यांनी ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचा सकारात्मक हेवा वाटतोय अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि आगामी काळात सावंतवाडी मध्ये युवराज लखमराजे भोसले व सावंतवाडी संस्थानच्या माध्यमातून ‘हेरीटेज रन’ मॅरॅथाॅन आयोजीत करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली.

काॅम्रेड मॅरॅथॉन ब्राॅन्झ पदकवीर श्री. ओंकार पराडकर यांच्या काकांनी ओंकारच्या मॅरॅथॉनच्या सुरवातीपासून त्याला दिलेल्या आहारविषयक मार्गदर्शनाची माहिती उपस्थितांना दिली आणि आपल्या पुतण्या ओंकारची व त्याचा सहकारी मित्र धावक प्रसादची कामगिरी जिल्ह्याच्या व देशाच्या सन्मानाची ठरली आहे व आता ती अनेकांसाठी प्रेरणा ठरणार आहे असे सांगितले.

यानंतर काॅम्रेड पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचा मान्यवर युवराज लखमराजे भोसले व डाॅ. जयसिंह रावराणे यांनी शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डाॅ. स्नेहल गोवेकर यांनी दोघांना आंब्याचे रोप देऊन सन्मानित केले. ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांच्या पदकांचा उत्सव दोघांच्या हस्ते केक कापूनही विशेष साजरा करण्यात आला.

यानंतर डाॅ. अनघा बोर्डवेकर यांनी ओंकार व प्रसाद यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले. बिल रोवाॅन पदकवीर श्री. प्रसाद कोरगांवकर यांनी त्यांच्या धावक म्हणून वाटचालीत आलेले अडथळे हे दूर करताना सिंधू रनर्स, रांगणा रनर्स व काही वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन याबद्दल सांगितले. सह धावक किंवा मॅरॅथॉन मध्ये प्रतिस्पर्धी असूनही वेळोवेळी सहकार्य, आग्रह व मार्गदर्शन केलेल्या ओंकार पराडकर यांचेही त्यांनी अनुभव सांगितले. आई वडिल व आपल्या वाडी, गावातील लोकांचे मिळत जाणारे प्रोत्साहन आपल्याला तंत्रशुद्ध पणे धावत रहायला मदत करतात असे सांगत त्यांनी काॅम्रेड मॅरॅथाॅन मधील पहिल्या सेकंदापासून ते फिनिश लाईनपर्यंतचा खडतर प्रवास कथन केला. उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार मानले व हा सत्कार आभारा पेक्षाही पलिकडचा असल्याची भावना व्यक्त केली.

पदकवीर श्री. ओंकार पराडकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये गेल्या पाच वर्षांत, धावक म्हणून सुरु त्यांचा प्रवास व काॅम्रेड मॅरॅथाॅनचे स्वप्न या बद्दल अत्यंत भावस्पर्शी कथन केले. या दरम्यान सहकार्य केलेले धावक डाॅक्टर्स, सिंधू रनर, रांगणा रनर्स यांचे त्यांनी आभार मानले. युवराज लखमराजे भोसले यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाची व त्यांच्या सदोदीत औदार्यशीलते विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ओंकार यांनी त्यांचे आई वडिल, पत्नी व कन्या यांचे विशेष आभार मानले. या सर्व प्रवासात आपण नोकरी सांभाळत होतो किंबहुना आपली फोर्ट्री प्रायवेट लिमिटेड ही कंपनी व त्यातील मॅनेजर वरुण नायर, दिनेश कस्तुरे, बिंदू नारंग, राजेंद्र वाबळे, अमृता नायर तसेच रेग्युलर्ली अफेअर्स टीम, स्टेबिलीटी ऑपरे न्स टीम व सि आर एस टीम हे सगळे आपल्याला धावण्याच्या ट्रेनिंग व स्पर्धांसाठी खुल्या दिलाने सहकार्य करतात व त्यांचे आनंदाने आभार मानणे हे महत्वाचे आहे हे आवर्जून सांगितले. द. आफ्रिकेत काॅम्रेड मॅरॅथॉन दरम्यान भारतीय म्हणून आपल्याला किती सर्वोच्च मान मिळाला याचे अनुभवही त्यांनी सांगितले. उपस्थित सर्वांचे व आयोजकांचे त्यांनी आभार मानले.

या पदकोत्सव व काॅम्रेड मॅरॅथॉन वीरांचा सत्कार या कार्यक्रमाचे सह संकल्पक व प्रमुख मान्यवर युवराज लखमराजे भोसले यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांनी प्राप्त केलेल्या यश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभिनंदनाचा भाग असल्याचे सांगितले. युवराज लखमराजे भोसले पुढे म्हणाले की आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धावक व ॲथलीट यांना एक नव्हे तर दोन दोन दीपस्तंभ एकाच वेळी प्रेरणा देत आहेत याचा आनंद आहे. युवराज लखमराजे भोसले यांनी, आपण सावंतवाडी हेरीटेज रनसाठीही सर्वतोपरी सहकार्य करुच असे सांगत ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी डाॅ. स्नेहल गोवेकर व डाॅ. प्रशांत मढव यांनी ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचे पुनश्च अभिनंदन करुन युवराज लखमराजे भोसले व उपस्थित मान्यवर, मॅरॅथॉन प्रेमी, डाॅक्टर्स, ॲडवोकेटस आणि सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

काॅम्रेड मॅरॅथाॅनचे पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचा जंगी सत्कार संपन्न.

सावंतवाडी संस्थान राजवाडा येथे बॅन्क्वेट हाॅलमधील विशेष कार्यक्रमात युवराज लखमराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी केला पदकवीरांवर अभिनंदनाचा वर्षाव.

सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : जगप्रसिद्ध अशा काॅम्रेड मॅरॅथॉन मध्ये, ९ जून २०२४ रोजी भारताचे प्रतिनिधित्व करुन जागतीक सन्मानाचे बिल रोवाॅन पदक आणि ब्राॅन्झ पदकांसह मायभूमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतलेले मॅरॅथॉन धावक श्री. प्रसाद कोरगांवकर व श्री. ओंकार पराडकर यांचा सावंतवाडीत जंगी सत्कार संपन्न झाला. शनिवारी १६ जून रोजी, सावंतवाडी संस्थान राजवाडा येथील बॅन्क्वेट हाॅलमध्ये सिंधु रनर्स, रांगणा रनर्स व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या संयुक्त सहभागाने हा विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. डाॅ. स्नेहल गोवेकर व डाॅ. प्रशांत मढव यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात काॅम्रेड मॅरॅथॉन पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांनी त्यांच्या मनोगता द्वारे संपूर्ण मॅरॅथॉन प्रवासाचे, त्यामागील घटकांचे आणि दोघांच्याही मॅरॅथाॅन क्षेत्रातील जीवनपटाचे कथन केले.

या कार्यक्रमात सुरवातीला डाॅ. प्रशांत मढव व डाॅ. स्नेहल गोवेकर यांनी या कार्यक्रमाचा विशेष उद्देश कथन केला आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन डाॅ. अनघा बोर्डवेकर यांनी प्रमुख उपस्थित मान्यवर युवराज लखमराजे भोसले व अन्य मान्यवरांना मंचावर आमंत्रित केले. यामध्ये पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धावक चळवळीचे आग्रही प्रोत्साहक अशी ओळख असलेले कुडाळ येथील डाॅ. जयसिंग राणे, तसेच ओंकार पराडकर यांचे वडिल श्री. दत्तात्रय पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचे वडिल श्री. लक्ष्मण कोरगांवकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे डाॅ. स्नेहल गोवेकर, डाॅ. प्रशांत मढव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमात ओंकार पराडकर यांचे वडिल व कुटुंबीय आणि प्रसाद कोरगांवकर यांचे आई वडिल यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या मनोगतामध्ये डाॅ. जयसिंह रावराणे यांनी ओंकार व प्रसाद यांच्या काॅम्रेड मॅरॅथॉनधील आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल त्यांची प्रशंसा करावी तितकी कमीच असल्याचे सांगितले. डाॅ. प्रशांत मढव यांनी ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचा सकारात्मक हेवा वाटतोय अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि आगामी काळात सावंतवाडी मध्ये युवराज लखमराजे भोसले व सावंतवाडी संस्थानच्या माध्यमातून 'हेरीटेज रन' मॅरॅथाॅन आयोजीत करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली.

काॅम्रेड मॅरॅथॉन ब्राॅन्झ पदकवीर श्री. ओंकार पराडकर यांच्या काकांनी ओंकारच्या मॅरॅथॉनच्या सुरवातीपासून त्याला दिलेल्या आहारविषयक मार्गदर्शनाची माहिती उपस्थितांना दिली आणि आपल्या पुतण्या ओंकारची व त्याचा सहकारी मित्र धावक प्रसादची कामगिरी जिल्ह्याच्या व देशाच्या सन्मानाची ठरली आहे व आता ती अनेकांसाठी प्रेरणा ठरणार आहे असे सांगितले.

यानंतर काॅम्रेड पदकवीर ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचा मान्यवर युवराज लखमराजे भोसले व डाॅ. जयसिंह रावराणे यांनी शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डाॅ. स्नेहल गोवेकर यांनी दोघांना आंब्याचे रोप देऊन सन्मानित केले. ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांच्या पदकांचा उत्सव दोघांच्या हस्ते केक कापूनही विशेष साजरा करण्यात आला.

यानंतर डाॅ. अनघा बोर्डवेकर यांनी ओंकार व प्रसाद यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले. बिल रोवाॅन पदकवीर श्री. प्रसाद कोरगांवकर यांनी त्यांच्या धावक म्हणून वाटचालीत आलेले अडथळे हे दूर करताना सिंधू रनर्स, रांगणा रनर्स व काही वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन याबद्दल सांगितले. सह धावक किंवा मॅरॅथॉन मध्ये प्रतिस्पर्धी असूनही वेळोवेळी सहकार्य, आग्रह व मार्गदर्शन केलेल्या ओंकार पराडकर यांचेही त्यांनी अनुभव सांगितले. आई वडिल व आपल्या वाडी, गावातील लोकांचे मिळत जाणारे प्रोत्साहन आपल्याला तंत्रशुद्ध पणे धावत रहायला मदत करतात असे सांगत त्यांनी काॅम्रेड मॅरॅथाॅन मधील पहिल्या सेकंदापासून ते फिनिश लाईनपर्यंतचा खडतर प्रवास कथन केला. उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार मानले व हा सत्कार आभारा पेक्षाही पलिकडचा असल्याची भावना व्यक्त केली.

पदकवीर श्री. ओंकार पराडकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये गेल्या पाच वर्षांत, धावक म्हणून सुरु त्यांचा प्रवास व काॅम्रेड मॅरॅथाॅनचे स्वप्न या बद्दल अत्यंत भावस्पर्शी कथन केले. या दरम्यान सहकार्य केलेले धावक डाॅक्टर्स, सिंधू रनर, रांगणा रनर्स यांचे त्यांनी आभार मानले. युवराज लखमराजे भोसले यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाची व त्यांच्या सदोदीत औदार्यशीलते विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ओंकार यांनी त्यांचे आई वडिल, पत्नी व कन्या यांचे विशेष आभार मानले. या सर्व प्रवासात आपण नोकरी सांभाळत होतो किंबहुना आपली फोर्ट्री प्रायवेट लिमिटेड ही कंपनी व त्यातील मॅनेजर वरुण नायर, दिनेश कस्तुरे, बिंदू नारंग, राजेंद्र वाबळे, अमृता नायर तसेच रेग्युलर्ली अफेअर्स टीम, स्टेबिलीटी ऑपरे न्स टीम व सि आर एस टीम हे सगळे आपल्याला धावण्याच्या ट्रेनिंग व स्पर्धांसाठी खुल्या दिलाने सहकार्य करतात व त्यांचे आनंदाने आभार मानणे हे महत्वाचे आहे हे आवर्जून सांगितले. द. आफ्रिकेत काॅम्रेड मॅरॅथॉन दरम्यान भारतीय म्हणून आपल्याला किती सर्वोच्च मान मिळाला याचे अनुभवही त्यांनी सांगितले. उपस्थित सर्वांचे व आयोजकांचे त्यांनी आभार मानले.

या पदकोत्सव व काॅम्रेड मॅरॅथॉन वीरांचा सत्कार या कार्यक्रमाचे सह संकल्पक व प्रमुख मान्यवर युवराज लखमराजे भोसले यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांनी प्राप्त केलेल्या यश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभिनंदनाचा भाग असल्याचे सांगितले. युवराज लखमराजे भोसले पुढे म्हणाले की आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धावक व ॲथलीट यांना एक नव्हे तर दोन दोन दीपस्तंभ एकाच वेळी प्रेरणा देत आहेत याचा आनंद आहे. युवराज लखमराजे भोसले यांनी, आपण सावंतवाडी हेरीटेज रनसाठीही सर्वतोपरी सहकार्य करुच असे सांगत ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी डाॅ. स्नेहल गोवेकर व डाॅ. प्रशांत मढव यांनी ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांचे पुनश्च अभिनंदन करुन युवराज लखमराजे भोसले व उपस्थित मान्यवर, मॅरॅथॉन प्रेमी, डाॅक्टर्स, ॲडवोकेटस आणि सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!