26.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

श्रेय कोणाचे..?.

- Advertisement -
- Advertisement -

श्री. विजय केनवडेकर यांनी केले स्पष्ट.

मालवण | प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या काही प्रश्नांबाबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या दीनदयाळ विद्युत योजनेतून मा. सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री यांनी भुयारी विद्युत वाहिनी जोडण्यासाठी मालवण शहरात भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला होता. 110 कि.मी. भुयारी विद्युत वाहिनी प्रकल्प मालवण शहरासाठी मंजूर झालेला होता. याचा निधी जिल्हा नियोजन कडे उपलब्ध झालेला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचेच होते. असे असताना मालवण शहरासाठी दिलेली भुयारी विद्युत वाहिनीच्या प्रकल्प याचे दोन भाग करून मालवण शहरासाठी 30 किलोमीटर व सावंतवाडी शहरासाठी 90 किलोमीटर अशी करण्यात आली. असे होत असताना आमदार वैभव नाईक यांनी का आवाज उठवला नाही? मालवण शहरात निधी उपलब्ध होऊनही सहा महिने ठेकेदार काम करत नव्हता .असे निदर्शनास येता प्रभू यांनी खास सभा बोलावून काम करण्याचे आदेश दिले. काम न केल्यास कारवाई सामोरे जावे लागेल असा दमयी भरला होता. त्यानंतर मालवण शहरात काम सुरू झाले .असे असताना मालवण किनारपट्टीवरील भुयारी विद्युत वाहिन्या विरोध करणारे आपल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी पुढे होते.त्यामुळे भुयारी विद्युत वाहिन्या ह्या केबल द्वारे पोल वरून नेण्यास भाग पाडले. मालवण शहरात मेढा भागामध्ये माजी नगरसेवक गणेश कुशे व उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी पुढाकार घेऊन भुयारी विद्युत वाहिनीचे काम सुरू करून घेतले व पूर्णत्वास नेले. यामुळे झालेल्या वादळामध्ये मालवण मेढा भागातील विद्युत वाहिन्यांची कोणतीही मोठी हानी न होता मेढा भाग पहिला दुरुस्त करण्यास यश विद्युत मंडळाला मिळाले होते. सावंतवाडी शहरात गेलेल्या निधीचा सहा वर्षे होऊ नही काम सुरूही झालेले नाही. त्याच वेळी जर आमदारानी पुढाकार घेतला असता तर मालवण शहर पूर्णपणे भुयारी विद्युत वाहिनेने जोडले गेले असते. ह्याच विद्युत वाहिन्या पोलवरून कार्यान्वित केल्यामुळे त्यामध्ये कार्बन व वाऱ्याच्या मोठ्या झोतामुळे वेळोवेळी केबल हलून आत मध्ये ना दुरुस्त झालेली केबल बदलता येत नसल्यामुळे दोन दिवस धुरीवाड्यासारखा भाग पूर्णपणे अंधारात होता.

         छोट्या मोठ्या वादळामुळे होत असलेल्या विद्युत समस्येबाबत मा. नारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी भुयारी विद्युत वाहिनी चा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिला होता. तो मंजूर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये भुयारी विद्युत वाहिनीच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला. हा निधी महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे आठ महिन्यापूर्वी जमा झाला आहे. त्याला आवश्यक असणारी यंत्रसामुग्री ह्याच निधीतून जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाली आहे. असे असताना काम का सुरू होत नाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपा मार्फत विचारणा करता भुयारी विद्युत वाहिनी टाकताना जो रस्ता गटार याची खोदाई केली जाते व काम पूर्ण झाल्यानंतर ते परत आहेत असे करून देण्यासाठी जो निधी उपलब्ध व्हायला पाहिजे होता तो निधीच उपलब्ध झाला नसल्यामुळे हे काम आम्ही करू शकत नाही. काम सुरू करायच्या आधी हा निधी नगरपालिकेकडे वर्गीकृत करावा लागतो व त्यांची ना हरकत दाखला घ्यावा लागतो. तरच काम सुरू करता येते असे निदर्शनात आल्यानंतर मा. निलेश राणे मालवण कुडाळ विधानसभा संयोजकयांच्या ही बाब निदर्शनात आणून दिली.यासाठी विशेष निधी जिल्हा नियोजन मधून द्यावा अशी मागणी निलेश राणे यांनी मा. पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांना भेटून निवेदन देऊन केली. 

मा.पालकमंत्री रवींद्र जी चव्हाण यांनी जिल्हा नियोजन च्या सभेमध्ये खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात आला.
मा. नारायण राणे यांनी विशेष सभा करून व मा.निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन मधून मा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मंजूर केलेला निधी मुळे पाऊस कमी झाल्यावर हे काम सुरू होणार हे लक्षात येताच भुयारी विद्युत वाहिनी प्रकल्प मंजूर करून निधी उपलब्ध अशा बातम्या देऊन प्रसिद्धी मिळवण्याचे काम व श्रेय घेण्याचे केविलवाणा प्रयत्न आमदार करताना दिसत आहे.
मा. सुरेश प्रभू यांनी मालवण शहरासाठी खास करून भुयारी विद्युत वाहिनीसाठी निधी उपलब्ध करून देऊनही तो निधी दुसऱ्या तालुक्यात जात आहे त्यासाठी विरोध का केला नाही?
भुयारी विद्युत वाहिनी प्रकल्प असताना पोलवरून का विद्युत वाहिन्या नेल्या याचा जाब का अधिकाऱ्यांना विचारला नाही? याचे पण उत्तर श्रेय घेत असताना आमदारांनी दिले पाहिजे.
भुयारी विद्युत वाहिन्या साठी व आवश्यक ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी ॲक्शन प्लॅन प्रत्येक दिवसाचा तयार करण्याचे निर्देश व 11 केव्ही विद्युत लाईन थेट मालवण पर्यंत जोडण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री व विद्युत मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंडळाला आवश्यक असणारे आपत्कालीन विभागामार्फत देण्यात येणारे विद्युत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा मा.नारायण राणे साहेबांनी केली असून विद्युत साहित्य सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विद्युत समस्येबाबत बऱ्याच प्रमाणात तक्रार निवारण होण्यास सुरुवात होणार आहे.
मालवण शहरात नियोजित भुयारी विद्युत वाहिन्या च्या कामाचे श्रेय हे मा.नारायण राणे खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा, पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण व मा. निलेश राणे यांचेच आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!