26 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

देवगड आगारात प्रवाशी दिन साजरा.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड आगारात आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिन कार्यक्रमात तालुक्यातील प्रवासी मित्रांनी अनेक सूचना व तक्रारी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांच्यासमोर चर्चा करून तसेच लेखी निवेदनाद्वारे मांडल्या.
देवगड प्रवासी मित्र दयानंद मांगले, हेमंत कुळकर्णी, सूरज कोयंडे, राजेंद्र मुंबरकर ,चांदोशी सरपंच दीपाली मेस्त्री,नारिंग्रे सरपंच महेश राणे,पडवणे उपसरपंच प्रकाश नार्वेकर,माजी उपसरपंच अजय जाधव,प्रदीप परकर भाजप किसान आघाडी अध्यक्ष भाई बांदकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. लेखी सूचना सादर केल्या.यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे विभाग नियंत्रक यानी सांगून काही सूचना व तक्रारी तात्काळ आगार पातळीवर मार्गी लावल्या.या प्रसंगी विभाग नियंत्रक अभिजित पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख,वाहतूक पर्यवेक्षक अमित कलघुटगी आगार व्यवस्था पक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर उपस्थित होते.

या प्रवासी दिनात नवीन शालेय प्रवासी फेऱ्या, तसेच
राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आगारात आगार कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच आवश्यक असणाऱ्या गाड्यांची कमतरता प्रामुख्याने जाणवत आहे. देवगड आगारात गेली काही वर्षे कार्यशाळा अधीक्षक, अथवा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हे पद रिक्त असल्याने कार्यशाळेतील कारभार हा एखाद्या हेड मेकॅनिकल ला सांभाळावा लागतो. प्रसंगी गाड्यांमध्ये असलेले बिघाड व त्या अनुषंगाने आवश्यक असणारी दुरुस्ती हे कार्यशाळा अधीक्षक अथवा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यासारखे जाणकार कर्मचारी नसल्याने अपेक्षेप्रमाणे दुरुस्ती होत नाही. याचाच परिणाम वारंवार गाड्या बिघडणे ,वाटेत नाजूस्त होणे, त्याचप्रमाणे गाड्यांच्या कमतरतेमुळे विलंबाने सुटणे, अशा पद्धतीच्या वाढत्या तक्रारी निर्माण होतात.

सद्यस्थितीत देवगड आगारात नियमित असणाऱ्या प्रवासी फेऱ्यांकरता आवश्यक असणाऱ्या एसटी गाड्यांची कमतरता असल्यामुळे चांगल्या भारमानाच्या प्रवासी फेऱ्या उदा. सर्वात प्रथम सुटणारी पहाटेची देवगड रत्नागिरी (नांदगाव मार्गे) तसेच देवगड उमरगा देवगड सांगली ही पश्चिम महाराष्ट्रात जाणारी गाडी गाड्यांच्या कमतरतेमुळे बंद करावी लागली या गाड्यांच्या कमतरतेमुळे कित्येक प्रवासी फेऱ्यांना विलंब होतो. त्यामुळे प्रवासी वर्गांची हे कुचंबणा होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो .या तात्काळ सुधारणा होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यशाळा अधीक्षक अथवा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हे रिक्त पण तात्काळ भरण्यात यावे. व प्रवासी गाड्यांची दुरुस्ती ही दर्जेदार व्हावी असे या निमित्ताने नमूद करावेसे असे वाटते.
या व्यतिरिक्त देवगड आगारातून सुटणारी देवगड अक्कलकोट,, देवगड पुणे या प्रवासी फेऱ्यांना वाटेत तरळा, वैभववाडी या ठिकाणी विशिष्ट वेळा दिले आहेत पूर्वी चे रस्त्यांची दुरुस्ती व या प्रवासी फेऱ्यांना नियोजित त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ पाहता पूर्वीप्रमाणे सुरू असलेली वेळापत्रक बदलून या लांब पाल्याच्या प्रवासी फेऱ्यांचा नाहक असलेला मधला थांबा हा कमी कालावधीचा करण्यात यावा व गाडी मार्गस्थ कराव्यात. त्याचप्रमाणे देवगड बेळगाव, देवगड पणजी, या मार्गावरील देखील प्रवासी फेऱ्या प्रसंगी कणकवली सावंतवाडी या ठिकाणी २० ते ३० मिनिटे थांबून ठेवावे लागतात. त्यानंतर त्या मार्गस्थ होतात. याकडे गांभीर्याने पाहून थांबण्याचा कालावधी कमी करण्यात यावा .
देवगड पणजी सकाळी ६.०० वाजता व दुपारी ११.३० वाजता सुटणारी प्रवासी फेरी पूर्वापार दोडामार्ग वरून जात आहे ही प्रवासी फेरी या मार्गावरून जात असल्यामुळे आणि ती फेरी सर्व थांबे घेत असल्यामुळे प्रवासाला विलंब होतो. त्यामुळे ही जलद करण्यात येऊन व्हाया बांदा पत्रा देवी मार्गे पणजी कडे मार्गस्थ करावी. त्यामुळे निश्चितपणे सद्यस्थितीत प्रवासी भारमानापेक्षा अधिक भारमान या प्रवासी फेरीला मिळू शकते.
देवगड आगाराची सद्यस्थितीत परिस्थिती पाहता सद्यस्थितीत देवगड आगाराची इमारत पूर्ण जीर्ण झालेली असताना निव्वळ या इमारतीवरील जुने प्लास्टर काढून त्यावर नवीन प्लास्टर व्यतिरिक्त कोणतेही काम होत नाही आतील स्टील पूर्णपणे गंजून काही ठिकाणी इमारतीचा भाग यापूर्वीच कोसळलेला आहे. असे असताना निव्वळ मलमपट्टी करून सुरू असलेले कामाची पहाणी करण्यात यावी अन्यथा तात्काळ थांबविण्यात यावे व इमारत निरलेखित करून ही नव्याने बांधण्यात यावी या व्यतिरिक्त या नवीन बांधकामांमध्ये सुलभ प्रसाधनगृह सुविधा निर्माण करण्याचे सूचित केले आहे. कोकणात गौरी गणपती सण मोठ्या प्रमाणात येत असताना देवगड बस स्थानक मधील प्रसाधन गृहांची दुरावस्था पाहता या ठिकाणी आवश्यक असणारे सुलभ शौचालय प्रसाधनगृह च्या कामाची सुरुवात तात्काळ करण्यात यावी व गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना दर्जेदार सुलभ प्रसाधनगृह करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात यावी. अशी आग्रही मागणी या निमित्ताने आम्ही आपणाकडे करीत आहोत. बस स्थानकावरील काही भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्यामुळे त्या खड्ड्यांवरून वाहने जात असताना त्या खड्ड्यातील चिखलांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. प्रवाशांचे बस स्थानक आगमन होत असताना पाय मुरगळणे अशी छोटे-मोठे अपघात होतात. याकडे देखील गांभीर्याने पाहवे .
देवगड आगाराची देवगड बोरीवली ही प्रवासी फेरी
शयनासनी असून वारंवार ना दुरुस्त होत असताना त्या ठिकाणी साधी प्रवासी फेरी सोडण्यात येते यासाठी एक जादा प्रवासी फेरी शयनासनी उपलब्ध करून द्यावी. अथवा नव्याने दर्जेदार प्रवासी गाड्या या मार्गावर देण्यात याव्यात .तसेच देवगड पुणे दिवसा व रात्री या मार्गावरील प्रवासी फेऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्रवाशांना अधिकाधिक गैरसोय होत असल्याने या मार्गावर नवीन गाड्या देण्यात याव्या या मार्गावरील प्रवासी फेऱ्यांना चांगले भारमान असताना देखील याकडे अपेक्षेप्रमाणे पाहिले जात नाही. तरी यात आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी अशी मागणी या निमित्ताने लेखी पत्राद्वारे देवगड प्रवासी मित्र यांच्यावतीने करण्यात आली

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!