28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

बोटाच्या क्लिकवर उपलब्ध ज्ञानाचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी करावा ; सुप्रसिद्ध वाॅटरस्पोर्टस उद्योजक श्री. अजित आचरेकर यांचे मार्गदर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.

मालवण | प्रतिनिधी : माणुस हा कायम विद्यार्थी असतो त्यामुळे आपले शिक्षण हे कधीच संपत नाही आणि संपणारेही नाही आज जग बोटाच्या एका क्कीलवर जवळ आले आहे त्यामुळे ज्ञानाची अनेक व्दारेही खुली झाल्याने विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचा योग्य वापर करून यश संपादन करावे असे प्रतिपादन अजित वॉटरस्पोर्ट्सचे उद्योजक अजित आचरेकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, युवा उद्योजक अजित आचरेकर, ब्ल्यू लाईन्स रेफ्रिजरेशनचे मालक उद्योजक अनंत मयेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, एमएसएटी (आयबीटी) च्या नेहा गवंडे, दर्शना मयेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई हे उपस्थित होते.

यावेळी अनंत मयेकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना त्यात करिअर करा असे सांगितले तर वामन खोत यांनी एखाद्या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्या क्षेत्राची आवड पाहिजे, आवडीच्या क्षेत्रात उतरणे हीच खरी मनुष्याची प्रगती असते, त्यामुळे तुमच्या आवडी व तुमच्यातील कौशल्य प्रत्येक टप्प्यानुसार विकसित करत राहा असे ते म्हणाले

यावेळी श्री. खोत सर यांच्या हस्ते अजित आचरेकर यांचा तर श्री. हेरेकर यांच्या हस्ते अनंत मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी नेहा गवंडे यांनी आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.

मालवण | प्रतिनिधी : माणुस हा कायम विद्यार्थी असतो त्यामुळे आपले शिक्षण हे कधीच संपत नाही आणि संपणारेही नाही आज जग बोटाच्या एका क्कीलवर जवळ आले आहे त्यामुळे ज्ञानाची अनेक व्दारेही खुली झाल्याने विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचा योग्य वापर करून यश संपादन करावे असे प्रतिपादन अजित वॉटरस्पोर्ट्सचे उद्योजक अजित आचरेकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, युवा उद्योजक अजित आचरेकर, ब्ल्यू लाईन्स रेफ्रिजरेशनचे मालक उद्योजक अनंत मयेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, एमएसएटी (आयबीटी) च्या नेहा गवंडे, दर्शना मयेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई हे उपस्थित होते.

यावेळी अनंत मयेकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना त्यात करिअर करा असे सांगितले तर वामन खोत यांनी एखाद्या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्या क्षेत्राची आवड पाहिजे, आवडीच्या क्षेत्रात उतरणे हीच खरी मनुष्याची प्रगती असते, त्यामुळे तुमच्या आवडी व तुमच्यातील कौशल्य प्रत्येक टप्प्यानुसार विकसित करत राहा असे ते म्हणाले

यावेळी श्री. खोत सर यांच्या हस्ते अजित आचरेकर यांचा तर श्री. हेरेकर यांच्या हस्ते अनंत मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी नेहा गवंडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!