मुंबई | प्रतिनिधी : मुंबईतील उदयोन्मुख बाल लेखिका व लेखनातील ‘चाईल्ड प्राॅडिजी’ म्हणून ओळखली जाणारी
कु. आदिती भालचंद्र पुजारे हिला तिने लिहीलेले पुस्तक ‘लव्हज ब्लिसफुल युनिअन’ साठी ब्री – बुक्स तर्फे तिला, बेस्ट सेलर ऑथर इन स्टेट’ व ‘प्लॅटीनम स्टार यंग ऑथर’ तसेच ‘बेस्ट सेलर ऑथर ऑफ स्कूल व बेस्ट सेलर ऑथर ऑफ सिटी’ अशा प्रमाणपत्रांनी गौरविण्यात आले आहे. ब्री बुक्सच्या समर कॅम्प लीग स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे. हे पुस्तक ॲमॅझाॅन वरती उपलब्ध आहे. साल २०२२ मध्ये देखील तिच्या एका पुस्तकाला गौरविण्यात आले होते.
मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवची कन्या असलेल्या कु. आदिती भालचंद्र पुजारे हिला लेखनासाठी, तिचे वडिल श्री. भालचंद्र पुजारे व आई सौ. काश्मिरा पुजारे यांच्यासह तिच्या शालेय शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. तिच्या या यशाचे श्रेय तिने पालक, शिक्षक व तिच्या वाचनाच्या आवडीलाही दिले आहे. कु. आदिती ही चिल्ड्रन्स ॲकॅडमी, कांदिवली ( पश्चिम ) या प्रशालेची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनी आहे.
कु. आदितीच्या यशाबद्दल तिची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.