ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यकारी अभियंत्यांची भेट.

आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यकारी अभियंत्यांची भेट.

प्रकाशन: 16 Jun 2025 06:54 PM
वाचन संख्या 60

अभियंता सौरभ माळी यांची वीज समस्या निवारणाची ग्वाही.

आचरा | ब्यूरो न्यूज : आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवार, १६ जून रोजी कणकवली येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन आचरा विभागातील वीज समस्या सोडवण्याची मागणी केली. त्याचबरोबर आचरा विद्युत सबस्टेशन येथे उपअभियंता, सहाय्यक अभियंता व लाईनमन पदे भरण्याची सूचना करण्यात आली. त्यावर सौरभ माळी यांनी चार दिवसात उपअभियंता व सहाय्यक अभियंता नेमण्याचे तसेच दोन दिवसात लाईनमनची नेमणूक करण्याचे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले तसेच वारंवार खंडित होणारा वीज प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही श्री. माळी यांनी दिली.

आचरा विभागातील विविध वीज समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याने आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन वीज समस्या मार्गी न लागल्यास २४ जून रोजी आचरा तिठा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतचे निवेदनही कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. याची गंभीर दखल घेऊन कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी आचरा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे. तसेच आंदोलन न करण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

आचरा येथे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्युत वाहिन्यांवरील झाडांची कटिंग करणे, घरांवरील धोकादायक विद्युत वाहिन्या शिफ्टिंग करणे, जीर्ण पोल, विद्युत वाहिन्या बदलणे, आचरा विद्युत सब स्टेशन येथे उपअभियंता, सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करणे, आउट सोर्स कर्मचारी भरण्याचे आश्वासन सौरभ माळी यांनी दिले आहे.

यावेळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक मंगेश टेमकर, विभाग संघटक पप्पू परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, आचरा शहर प्रमुख माणिक राणे, युवासेना प्रमुख विद्यानंद परब, माजी सरपंच श्यामसुंदर घाडी, ग्रा. पं. सदस्या पूर्वा तारी, मच्छीमार नेते नारायण कुबल, अर्चन पांगे, परेश तारी, नंदू कांबळी, सचिन बागवे, बागवे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स