ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी. स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा. नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..! जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २७ ऑक्टोबर रोजी ‘कायाकल्प' उपक्रम. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.


Article image

अक्कलकोट | प्रतिनिधी : नागणसूर येथील श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा 'जगद्गुरु बसवलिंगरत्न पुरस्कार', तुप्पीन मठाचे डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांना प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध ज्ञान योगाश्रम मठाचे मठाधिपती प. पू. बसवलिंग महास्वामीजी यांनी महेश इंगळे यांच्या सर्वांगीण सामाजिक, अध्यात्मिक योगदानाची प्रशंसा केली. त्यांची नम्रता, सेवाभाव आणि धर्माबद्दल असलेल्या आस्थेला अनुरूप पुरस्कार प्रदान करताना आनंद झाल्याचेही त्यांनी नमूद केले व पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. 


यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, संतोष पराणे, सचिन किरनळ्ळी, श्रीकांत झिपरे, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, सुनिल पवार, अंकूश केत, डॉ. राजू मलंग, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, बाळासाहेब एकबोटे, रमेश शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, स्वामीनाथ मुसळे, बसवराज करूटे आदींसह नागणसूर परिसरातील तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरीक भाविक आदीसह विवीध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

महेश इंगळे यांना हा पुरस्कार मिळाल्याने अक्कलकोट नगरीसह विविध ठिकाणाच्या स्वामी भक्तांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स