वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे मसुरे चांदेर गावचे सुपूत्र व उद्योजक डॉ. दीपक परब यांनी लॅपटॉप आणि प्रिंटर श्री स्वामी समर्थ मठास भेट दिला. याबाबत मठाचे अध्यक्ष दीपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी त्यांचे लक्ष वेधले होते.
यावेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी, उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. तसेच श्री स्वामी समर्थांवर त्यांची श्रद्धा असून मठाच्या कोणत्याही कार्यात किंवा अडचणीच्या वेळी त्यांची मदत होते. त्यांनी यापूर्वीही मठाला वेळोवेळी सहकार्य केले असून, ही संगणकीय भेट मठाच्या आधुनिक वाटचालीस उपयुक्त ठरेल असे चंद्रकांत हडकर यांनी सांगितले.
यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी अध्यक्ष दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सरचिटणीस सुनील खरात, उपाध्यक्ष दिनेश साळकर, चिटणीस कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, सदस्य रामदास प्रभू, पंडित खोत, सुधीर घागरे, सविता राणे यांनी उद्योजक डॉ. दीपक परब यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)