ज्येष्ठ समाजसेविका वंदना करंबेळकर यांना 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक' पुरस्कार जाहीर.
ज्येष्ठ समाजसेविका वंदना करंबेळकर यांना 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक' पुरस्कार जाहीर.
मालवण | प्रतिनिधी : यंदाच्या 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक' पुरस्काराची घोषणा झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा. बि. सह. पतसंस्था मर्या. आचरा या संस्थेतर्फे गेली ३ वर्षे हा पुरस्कार देण्यात येत आहे. यंदा चौथ्या वर्षी हा पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना श्रीकृष्ण करंबेळकर यांना जाहीर झाला आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांचे विशेष प्रभावी योगदान आहे. दि.२५ ऑगस्ट २०२६ रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती श्री देव रामेश्वर ग्रा. बि. सह. पतसंस्था मर्या. आचरा अध्यक्ष मंदार सांबारी यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)