बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
शिष्यवृत्ती परीक्षेतील पाल्यांच्या पालकांसाठी आयोजित स्पर्धा.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ द्वारा अनुदानित आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित बॅरिस्टर नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ च्या औचित्याने रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या ना. ग. गोरे सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कार्यकारिणी सदस्य दिपक भोगटे, कार्यकारिणी सदस्य डॉ. सुमेधा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारिणी सदस्य दिपक भोगटे यांनी प्रास्ताविक करताना, शिष्यवृत्ती परीक्षेतील पाल्यांच्या पालकांसाठी आयोजित स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. बॅरिस्टर नाथ पै या संस्थेमध्ये पाल्य शिक्षण घेत असताना पालकांना देखील त्यांची माहिती व्हावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेमध्ये जवळपास ३३ पालकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा हुनारी यांनी केले तर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर, ग्रंथपाल ऋतुजा केळकर, गौरी केळुसकर आणि सहकाऱ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
या स्पर्धेतील विजेत्या व सर्व सहभागी स्पर्धकांना २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनावेळी साहित्यिकांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड.
अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.