साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
सावंतवाडी येथील साहित्यिक आणि कोमसाप, सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर उर्फ दीपी यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान (रजि.) मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मानसी पंडित यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित चतुर्थ साहित्य संमेलन, ठाणे येथील नौपाडा शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रोटरी क्लब हॉल येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष गझलकार डॉ.सुधाकर गर्दे, उद्घाटक गझलकार डॉ.राजेंद्र केगार, कवी संमेलन अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौंड, स्वागताध्यक्ष दीपाली घाटगे, अमृता गोडबोले, गझलकार किरण वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपक पटेकर यांनी 'अंतरीचे बोल' या सदराखाली ललित लेख स्तंभलेखन केले होते. त्यांच्या या लेखनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान ही साहित्यिक संस्था असून गेली सात वर्षे मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेतर्फे साहित्यिकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी संस्थेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेते, वर्षभर संस्थेने आयोजित केलेल्या स्तंभलेखन पद्य व गद्य विभागात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या साहित्यिकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवीत करण्यात येते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शंभरहून जास्त साहित्यिक उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष मानसी पंडित, खनिजदार निखिल कोलते, प्रमोद कोलते, मनाली पंडित, किरण वेताळ, कवयित्री डॉ. मानसी पंडित, राजेश नागुलवार, विनिता कदम, पल्लवी भागवत, योगिता तकतराव आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले.
पुरस्कार प्राप्तीसाठी, साहित्यिक दीपक पटेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
सावंतवाडीत 'प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन' स्पर्धेचे ३० ऑगस्टला आयोजन.
सावंतवाडीत 'प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती ...
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...