ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी. स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा. नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..! जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २७ ऑक्टोबर रोजी ‘कायाकल्प' उपक्रम. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.

Article image

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६.


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात, 'मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ द्वारा अनुदानित आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित' तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ च्या औचित्याने रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ८ वी ते १० वी गटासाठी होती. या स्पर्धेसाठी, 'मला आवडलेले स्वातंत्र्य सैनिक' असा वक्तृत्वाचा विषय होता. यावेळी मंचावर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य दिपक भोगटे, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर उपस्थित होते. 

Article image

मनोगत: साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर व कार्यकारिणी सदस्य दिपक भोगटे


स्पर्धेची सुरुवात वैष्णवी आचरेकर आणि रुचिता चिंदरकर यांनी साने गुरुजींच्या 'खरा तो एकचि धर्म' या प्रार्थना सादरीकरणाने केली. त्यानंतर बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. 

Article image

परीक्षक मान्यवर : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर व कार्यकारिणी सदस्य दिपक भोगटे


साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परीक्षकांचा परिचय करून देताना, स्पर्धकांसाठी निवडलेल्या प्रा. वासंती किणीकर लिखित 'क्रांतिज्योती' पुस्तकाचा उद्देश स्पष्ट करताना मालवणमधील क्रांतिकारकांची माहिती व्हावी, यासाठी क्रांतिज्योती पुस्तकाची निवड केली असल्याचे सांगितले. दिपक भोगटे यांना ही अभिनव संकल्पना सुचल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. परीक्षक दिपक भोगटे व परीक्षक किशोर शिरोडकर यांनी क्रांतिकारी चळवळ अभ्यासलेली आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेचे परीक्षण होणे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी केले. तसेच येत्या २८ व २९ नोव्हेंबर २०२६ ला नियोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात सर्व युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. 

Article image

सूत्रसंचालक


परीक्षक दिपक भोगटे यांनी मनोगत व्यक्त करताना, 'क्रांतिज्योती' पुस्तकाच्या लेखिका वासंती किणीकर यांच्या पुस्तक लेखनाच्या मेहनतीची प्रशंसा केली. 'क्रांतिज्योती' या पुस्तकातील काही व्यक्तींचा सेवांगणच्या निर्मितीमध्ये सहभाग होता, अशीही त्यांनी माहिती दिली.


या वक्तृत्व स्पर्धेत रोझरी इंग्लिश मिडियम स्कूल, मालवण, अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण, भंडारी हायस्कूल, मालवण, कन्याशाळा मालवण, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग मालवण या प्रशालांचा सहभाग होता. स्पर्धकांनी शामराव कोचरेकर, हुतात्मा दत्ताराम कोयंडे, बबन डिसोझा, मारुतीराव शिरसेकर, हुतात्मा प्रभाकर रेगे व केशव घुर्ये, वसंत व्यंकोजी सामंत, दादासाहेब शिखरे, कृष्णाजी कान्होजी लुडबे आणि रामराव पांगे या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्यावर वक्तृत्व सादर केले. स्पर्धेचे परीक्षण किशोर शिरोडकर व दिपक भोगटे यांनी केले. 


शालेय वयात वक्तृत्वकला विकसित होण्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यामध्ये योगदान दिलेली स्थानिक व्यक्तिमत्वे जाणून घ्यावीत असा या उपक्रमामागील उद्देश होता.


यावेळी साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, दिपक भोगटे, गौरी केळुसकर, व्यवस्थापक संजय आचरेकर यांच्यासह प्रदीप सामंत, शिक्षक, पालक व स्पर्धक उपस्थित होते. सूत्रसंचालन साने गुरुजी वाचन मंदिर ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले.


या स्पर्धेतील विजेत्या व सर्व सहभागी स्पर्धकांना २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनावेळी साहित्यिकांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स