ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची रिक्षा दुर्घटनेतील कुटुंबियांना २५ हजारांची मदत.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची रिक्षा दुर्घटनेतील कुटुंबियांना २५ हजारांची मदत.

प्रकाशन: 23 Jun 2025 09:42 PM
वाचन संख्या 158

आचरा | ब्यूरो न्यूज : चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू ही अत्यंत हृदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली. यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू शकत नाही. मन हेलावून टाकणारी अशी ही घटना आहे. अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा भागात कार्यक्रम साजरे न करण्याचा निर्णय भाजप तर्फे घेण्यात आला असून ते कार्यक्रम थांबविण्यात आले असल्याचे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवार, २२ जून रोजी रिक्षा अपघातात मयत चारही कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पंचवीस हजारांची मदत देवू केली.नारींग्रे येथे झालेल्या भीषण रीक्षा अपघातात आचरा देवूळवाडी येथील संकेत सदानंद घाडी, गाऊडवाडी येथील संतोष रामजी गावकर, रोहन मोहन नाईक आणि पिरावाडी येथील सोनू कोळंबकर या युवकांचे निधन झाले होते. याबाबतची माहिती समजताच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवारी सायंकाळी आचरा येथे संबंधित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.

यावेळी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, राजन गावकर, महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर, मंदार साबारी, पांडुरंग वायंगणकर, राजन पांगे, अजित आचरेकर, विजय निकम, धनंजय टेमकर, रविंद्र घागरे, मंदार सरजोशी, जयंत पांगे, सिद्धार्थ कोळगे, वाडेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स