चिंदर माऊली मंदिर परिसरातील ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ.
चिंदर माऊली मंदिर परिसरातील ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ.
भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पंचायत समिती गट नेते दीपक सुर्वे, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चिंदर माऊली मंदिर परिसरात यात्रेच्या वेळी वारंवार विद्युत पुरवठा कमी दाबाने होतो. त्यामुळे येथील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी येथे जिल्हा नियोजन मधून ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला.
हे काम मंजूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी विशेष प्रयत्न केले. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, विकास संस्था चेअरमन देवेंद हडकर, शेखर पालकर, सुबोध गावकर, संजय हडपी, सुनील पवार, आनंद पवार, दिशांत पारकर, दिगंबर जाधव, गुरु जावकर, शशी नाटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)