ताज्या बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
एक जगणं चिरंजीव ...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एक जगणं चिरंजीव ...!

एक जगणं चिरंजीव ...!

Article image

मालवणचे शिक्षक महेश धामापूरकर वाढदिवस विशेष


विशेष : चिरंजीव....! चिरंजीव हा शब्द, 'जबाबदार मुलगा तसंच सालस मुलगा' अशी प्रतिमा डोळ्यांसमोर आणतो. अशा 'माणुस मुलांपैकी' एक डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे महेश धामापूरकर...!


१९९६ /१९९७ साली, तत्कालिन शांती कुटीरच्या आवाराला लागून असलेल्या वसतिगृहात 'डि. एड.' च्या विद्यार्थ्यांचा एक सालस आणि शिस्तबद्ध वावर असायचा. त्यातल्या अनेकांपैकी एकाची 'सालसता' ही चटकन् जाणवायची. त्यावेळी, काही रांगड्या भासू शकत असलेल्या सवंगड्यांसोबत सुद्धा त्याने त्याचा सालसपणा निक्षून आणि तरिही सहज जपलेला जाणवायचा. थोडेसे अश्रू आणि हुंदका आवरल्यासारखा चेहरा, मनातला हळवेपणा मुखावर आला तरिही मन सक्षमसुद्धा आहेच असं बोलणारे डोळे, आश्वस्त करणारं हास्य आणि 'हा मुलगा कधीच फालतुगिरी व उपद्रवी मस्ती करत नसणारच' असं अनोळखी माणुसही पहिल्या भेटीनंतर बाॅन्ड पेपरवर लिहून देईल इतकी सच्ची विनयशीलता त्याने जपलेली होती...आणि आजही 'त्यांच्यात' आहे. 

तो 'मुलगा माणुस' अक्षरशः एकेक पाऊल अत्यंत विचाराने चालायचा...चालतोय.


श्री. महेश धामापूरकर हे शिक्षक, कलावंत, भाषा व कीर्तन जाणकार आणि अध्यात्मिक उन्नतीचे आग्रही व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध आहेत आणि सोबतच प्रत्येक 'सूज्ञ पालकाला' हवाहवासा असलेला एक 'चिरंजीव' पणा ते नकळत जन्माला घेऊन आलेत..!


आपल्यापेक्षा ज्येष्ठांशी 'संवाद' म्हणजे नेमकं काय आणि आपल्यापेक्षा लहानांशी 'बोलणं' कसं असतं याचाही वस्तुपाठ घालून देणारे एक 'वर्तन आश्चर्य' म्हणून महेश धामापूरकर अनुकरणीय आहेत. राग, चीड, उद्विग्नता आणि हतबलतेसाठी त्यांची सुसंस्कृत व्यक्तता ही त्यांच्यातल्या संस्कारक्षम पेशींच्या रचनेला त्यांनी किती व कशा निग्रहाने राखत राखत 'जाणतेपण' मिळवलंय याची साक्ष आहे...! महेश धामापूरकर यांनी केवळ ज्ञान, माहिती, कला कौशल्याच्या सादरीकरणाला सज्ञानत्व मानलं नाही तर ते सुसंस्कृत संवेदनेचा संस्कार जपण्यासाठी निक्षून चिरंजीवपणाची जबाबदारी घेत जगतात हे नक्कीच शिकण्यासारखं आहे.


....आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महेश धामापूरकर चिरंजीव व सालस आहेत पण ते कधीच 'बिच्चारे' वाटत नाहीत ही त्यांच्यातल्या अखंड संत सरितेच्या खळाळाची साक्ष आहे...!




सुयोग पंडित, मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स