आय पी एस सुभ्रमण्य केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत.
आचरा | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात आज १६ जून रोजी एकाच दिवशी सर्व शाळा सुरू झाल्या असून मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंदर नं १ शाळेत २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षांकरिता नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सुक कार्यक्रम आय.पी. एस. सुभ्रमण्य केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
आय. पी. एस. सुभ्रमण्य केळकर यांच्या हस्ते मुलांना शालेय पुस्तके, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना स्पर्धात्मक युगाच्या अनुषंगाने सांस्कृतिक, खेळ, आरोग्य, योग, शारीरिक शिक्षण यांनाही शासन महत्त्व देत आहे असे सांगितले. त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा आनंद घेण्याचे आवाहनही केले. शिक्षकांनी वेगवेगळ्या उपाययोजना करत, विविधांगी उपक्रम राबवावेत असा सल्ला श्री. केळकर यांनी दिला.
यावेळी केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड, सचिन तवटे, मकरंद केळकर, ॲड. गायत्री राजोपाध्याय – केळकर, दिनेश पाताडे, निलिमा घाडी, रावजी तावडे, शाळा कमिटी अध्यक्ष, पालक, आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)