ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा.

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा.

प्रकाशन: 23 Jun 2025 10:21 PM
वाचन संख्या 68

आचरा | ब्यूरो न्यूज : राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चिंदर व माऊली ग्रुप चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दहावी – बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार, २३ जून रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. चिंदर गावातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, पेन, भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रकाश मेस्त्री, माजी कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मालवण पंचायत समिती माजी कृषीअधिकारी तसेच रत्नागिरी येथून सेवानिवृत्त गटविकास अधिकारी संजय गोसावी व चिंदर नूतन ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सानिका चिंदरकर, दिनेश पाताडे, चिन्मयी पाताडे, स्वरा चिंदरकर, समृध्दी अपराज, प्रतिक्षा पालकर, सर्वेश अपराज, ओल्विन फर्नांडिस, संतोष अनंत अपराज, सोहम चिंदरकर, विराज सावंत, विघ्नेश भरतू, संतोष अपराज, राजाराम केळुसकर, बाळा चव्हाण, अनिल लब्दे, साधना पाताडे, दिव्या गोसावी, प्रिया पालकर, दिगंबर जाधव, विश्राम माळगावकर, रणजीत दत्तदास, समीर अपराज, रोशनी फर्नांडिस, रोहित पाटील, तुषार पवार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, माऊली गृप सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स