ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
श्री बाबू घाडीगांवकर यांना 'कोकणदीप शिक्षणरत्न' पुरस्कार प्रदान.

श्री बाबू घाडीगांवकर यांना 'कोकणदीप शिक्षणरत्न' पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 23 Jun 2025 10:05 PM
वाचन संख्या 86

आचरा | ब्यूरो न्यूज : कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ या संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. दादर, मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोकणदीप या मासिकाने चोविसाव्या वर्षात पदार्पण केल्याने कोकणदीप मासिकाच्या तेवीसाव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी राज्यमंत्री योगेशदादा कदम, दै. प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे, डॉ. राम मेस्त्री, कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स