ताज्या बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.

४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.

Article image

सिंधुदुर्ग बास्केटबॉल असोसिएशन सचिव अजय शिंदे यांची माहिती. 


क्रीडा | ब्यूरो न्यूज : पुणे येथे, मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ पासून चोंढे पाटील क्रीडा संकुलात सुरू होणाऱ्या सीएम चषक ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या गटात वैष्णवी परदेशी आणि मुलांच्या गटात अयान सोरठिया हे १२ सदस्यीय महाराष्ट्र संघांचे नेतृत्व करणार आहेत. सिंधुदुर्ग बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.


भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या (BFI) आश्रयाखाली महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेद्वारे (MSBA) U-16 खेळाडूंसाठी आठ दिवसीय राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाते.


राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, आज मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.


राष्ट्रीय चॅम्पियनशिप दरम्यान महाराष्ट्राच्या संघांकडून असलेल्या अपेक्षांबद्दल बोलताना, एमएसबीएचे सचिव गोविंद कृष्णन मुथुकुमार यांनी पदक मिळवण्याबद्दल विश्वास व्यक्त केला. गोविंद म्हणाले की आमचे दोन्ही संघ चांगली कामगिरी करतील. आम्ही २०११ नंतर राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन करत असल्यामुळे, आम्ही दोन्ही संघांसाठी दोन दीर्घ शिबिरे आयोजित केली होती. आमचा मुलींचा संघ गेल्या वर्षी पुदुचेरीमध्ये जिंकलेले विजेतेपद नक्कीच टिकवून ठेवेल. आमचा मुलांचा संघही पदक मिळवेल.


महाराष्ट्राच्या मुलींच्या चमूत कर्णधार वैष्णवी परदेशी हिच्या नेतृत्वाखाली तन्वी जाधव, सिया भोसले, सायसा भगत, त्रिशा कार्की, ध्रुवी पिसाळ, शरण्या सावंत, नायला इनामदार, अनुषा सोनटक्के, कनिष्क गायकवाड, पंखुडी बडे, तनिरिका चक्रवर्ती या खेळाडूंचा समावेश आहे. 

ललित नाहटा हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असून त्यांना 

प्रशिक्षक दशरथ बिरहमाने व प्रशिक्षक सोनेश झोरे यांची साथ लाभली आहे. देवंशी लुनावत यांच्याकडे मुलींच्या संघ व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.. 


मुलांच्या संघात कर्णधार अयान सोरथिया याच्या नेतृत्वाखाली अमेय दरवाटकर, इम्रान अन्सारी, आराध्या भावसार, आयमेन शेख़, केविन नाडर, ओम राऊत, अंश भाटिया, जिवीत अवाटे, हर्षित बरहट, आरव पांडे, गुलशेरख़ान पठाण ह्या खेळाडूंचा समावेश आहे. 

नासिर अन्सारी हे ह्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असून त्यांना प्रशिक्षक रोहन जगताप व प्रशिक्षक संकेत भगवत सहाय्य करणार आहेत. श्री. ओंकार धराशिवकर हे ह्या संघाचे व्यवस्थापक आहेत. 


सिंधुदुर्ग बास्केटबॉल असोसिएशन सचिव अजय शिंदे यांनी ह्या स्पर्धेच्या शुभारंभाची उत्सुकता शिगेला पोहचत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत असे सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स