ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आचरा तिठा येथे २५ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा तिठा येथे २५ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धा.

आचरा तिठा येथे २५ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धा. 

Article image

मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर पुरस्कृत प्रथम व द्वितीय क्रमांकाचे चषक आणि स्पर्धेत पैठणीसह विविध भेटवस्तूंची रेलचेल.


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा तिठा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे ५ वे वर्ष असून मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी आचरा तिठा येथे दुपारी २ वाजता ही स्पर्धा संपन्न होणार आहे.


या स्पर्धेसाठी प्रथम १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येण्यात येणार असून प्रवेश शुल्क ₹२५० आहे. प्रथम क्रमांक विजेत्यास ₹ ५००१ व चषक व द्वितीय क्रमांक विजेत्यास ₹ ३००१ व चषक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. हे चषक मालवण नगरसेवक मंदार ओरसकर यांनी पुरस्कृत केले आहेत. 


या स्पर्धेत आचरा विभागातील महिलांसाठी मोफत नारळ देण्यात येणार असून प्रथम ३२ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. महिला स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांक विजेत्यांना गजानन गांवकर पुरस्कृत पैठणी व द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. 


स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी रुपम टेमकर (9168107010), विद्यानंद परब (9421144376), लिलेश मांजरेकर (8275640707), दर्शन चिंदरकर (8459926429), माणिक राणे (9421237810) व सचिन रेडकर (9421040257) यांच्याशी संपर्क साधावा तसेच या नारळ लढवणे स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स