ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण येथे १५ जून रोजी सुतार समाज बांधव मेळावा.

मालवण येथे १५ जून रोजी सुतार समाज बांधव मेळावा.

प्रकाशन: 14 Jun 2025 05:11 PM
वाचन संख्या 93

आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि सुतार समाज बांधव मेळावा रविवार, १५ जून रोजी सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय, मालवण येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर पुणे, राज्य समन्वयक दिलिपराव आकोटकर, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा क्रांतीदल अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ, कोकण विभागीय समन्वयक आनंद मेस्त्री, सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत.

सदर मेळाव्यात संत भोजलींगकाका सुतार आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी समस्त मालवण तालुका सुतार समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स