ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्गात येत्या काळात पासपोर्ट संदर्भातील कार्यालय.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्गात येत्या काळात पासपोर्ट संदर्भातील कार्यालय.

प्रकाशन: 14 Jun 2025 04:32 PM
वाचन संख्या 219

पालकमंत्री नितेश राणेंनी केले स्पष्ट.

दोडामार्ग | ब्यूरो न्यूज : मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली पासपोर्ट संदर्भातील मुलाखतीची प्रक्रिया गोवा येथे पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी केली आहे. नानचे यांनी यासंदर्भातील एक निवेदनही मंत्री राणे यांच्या कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी भेट घेत सादर केले आहे.

यावेळी मंत्री राणे म्हणाले की, येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यातील अनेक युवक युवती वेगेवगेळे कोर्सेस करून विदेशात रोजगार, पर्यटन व शिक्षणासाठी जातात आणि परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्वाचा पासपोर्ट लागतो. हा पासपोर्ट मिळविण्यासाठी यापूर्वी मुंबईत जावे लागायचे. त्या ठिकाणाच्या कार्यालयात कागद पत्रांची पडताळणी व मुलाखत होत असे. त्यानंतर ही प्रक्रिया नागरिकांच्या सोयीसाठी गोवा राज्यातील पणजी येथील पासपोर्ट कार्यालयात सुरू करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांना गोव्यात जाऊन कागद पत्रांची पडताळणी व मुलाखत देणे सोयीस्कर पडत होते. मात्र आता ही गोव्यात होणारी प्रक्रिया महाराष्ट्र नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली असून परत एकदा ही प्रक्रिया मुंबई येथे घेण्यात येत आहे. ते खूपच खर्चिक व वेळेचा अपव्यय होण्यासारखे आहे. एकतर ही प्रक्रिया सिंधुदुर्गात सुरू करावी अन्यथा गोव्यातील पणजी येथील कार्यालयात पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील सिंधुदुर्गवासियांची आहे. तरी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही प्रक्रिया आपल्या माध्यमातून सुरू करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान मंत्री राणे म्हणाले की, केलेली मागणी ही सिंधुदुर्गवासीयांसाठी गरजेची आहे. आपल्या भागाचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जिल्हावासियांसाठी सुरू करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. येणाऱ्या काळात लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत घेण्याचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी संतोष नानचे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स