मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किट वाटप.
मालवण | ब्यूरो न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मनसेच्या वतीने जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण शहराध्यक्ष सागर जाधव, पार्थ परब, अनिल चव्हाण, संदीप तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)