मालवणात मावळत्या दिनकराच्या साक्षीने कथावाचन उपक्रमाचे चौथे पुष्प.
वैशाली पंडित यांनी वंदना करंबेळकर यांच्या अनुवादीत कथेचे केले वाचन.
अभियान आम्ही मालवणीच्या वतीने आयोजित उपक्रमाला संकल्पक नितीन वाळके, ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक रुजारिओ पिंटो व मान्यवर उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला, वाचू आनंदे! मावळत्या दिनकराच्या साक्षीने…’ साहित्यिक उपक्रमांतर्गत १ मे रोजी राॅक गार्डन, मालवण येथे चौथ्या पुष्पात ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
साहित्यिका पंडित यांनी ‘विमुक्ता’ हे तेलगू लेखिका वोल्गा यांचे पुस्तक जे वंदना करंबेळकर अनुवादित आहे त्यातील ‘बंदिस्त राम आणि संगम’ ही कथा सादर केली. ॠतुजा केळकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
यावेळी नितीन वाळके, ज्येष्ठ कवी व कोमसाप जिल्हा समन्वयक रुजारिओ पिंटो, बाळ नरे, राजा काजरेकर, स्मिता बर्डे, चारुशीला देऊलकर, फिलोमीना पंडित, ऋतुजा केळकर व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)