ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
'पुस्तकाने मला काय दिले' स्पर्धेचा निकाल जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'पुस्तकाने मला काय दिले' स्पर्धेचा निकाल जाहीर.

प्रकाशन: 21 Sep 2024 01:12 PM
वाचन संख्या 274

बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा यांचे आयोजन.

मालवण – मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा, आयोजित कै. भाऊ गुराम पुण्यतिथी निमित्त
‘पुस्तकाने मला काय दिले’, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १०० विद्यार्थ्याना अंधश्रद्धा निर्मूलन व साने गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तके वाचनासाठी दिली गेली होती. त्या पुस्तकामधून ‘मला काय गवसले’ हे मुलांनी २०० शब्दात लिहून स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेत मोठ्या गटात स्वरा अर्जून पेंडूरकर, खरारे हिने प्रथम क्रमांक व लहान गटात पलक पराग महाभोज, गुरामवाडी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मोठ्या गटात द्वितीय क्रमांक साई राज शंभू परुळेकर वराड, मधुर अर्जून पेंडूरकर खरारे तृतीय क्रमांक,त्रिशा देवदास रेवडेकर, कट्टा उत्तेजनार्थ यशिका देवू पालव वराड, जान्हवी संतोष नांदोसकर नांदोस, गिरीजा राजेंद्र नाईक कुणकवळे यांनी यश मिळवले.

लहान गटात द्वितीय सोहम सूर्यकांत गावडे, कट्टा, तृतीय . काव्य विनोद दळवी, ओरोस, वैष्णवी संदीप गोळवणकर गोळवण तर उतेजनार्थ प्रणित सूर्यकांत शिंदे, वराड, वृषभ दतात्रय टेमकर, वराड,
गायत्री गणेश साळुंके, पेंडूर, राशी सत्यवान चव्हाण, चौके, धनश्री आनंद बाक्रे, वराड, ईश्वरी उत्तम पाताडे, कट्टा, वेदिका प्रमोद तेंडोलकर, कट्टा, पायल फुलाराम देवासी, कट्टा यांनी यश मिळवले.

या स्पर्धेतील विजेते व सर्व सहभागी विद्यार्थीनींना २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता, कै. भाऊ गुराम यांचे स्मृतिदिनी सौ. देवयानी गावडे ( मुख्याध्यापिका वराडकर हायस्कूल कट्टा) व सौ. प्रिया मयेकर (मुख्याध्यापिका, वराड हायस्कूल) यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन
संयोजक दिलीप रामचंद्र गुराम, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड,
शाम पावसकर यानी सेवांगणच्या वतीने केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स