ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार साहित्यिक.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार साहित्यिक.

प्रकाशन: 17 Oct 2024 02:06 PM
वाचन संख्या 273

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाने या मंडळाला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी संबंधित अध्यक्ष व २४ सदस्य अशा एकूण २५ सदस्यांची निवड केली जाते ही निवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी नव्या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे, उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये तसेच सिंधुदुर्गातून सदस्य म्हणून साहित्यिक वामन पंडित, महेश केळुसकर, महादेव देसाई, वृंदा कांबळी व डॉ. शरयू आसोलकर यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या साहित्यिका तथा कोमसाप अध्यक्ष नमिता कीर आणि मूळ वैभववाडी येथील व मुंबईस्थित साहित्यिक अशोक राणे यांचीही या मंडळावर नियुक्ती झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स