ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
निवेदक भूषण सावंत यांचा सासोली येथे सत्कार.

निवेदक भूषण सावंत यांचा सासोली येथे सत्कार.

प्रकाशन: 10 Oct 2024 05:19 PM
वाचन संख्या 159

दोडामार्ग | ब्युरो न्यूज : श्री नवदुर्गा सांस्कृतिक नवरात्रौत्सव मंडळ सासोली येथे उत्तम निवेदन केल्याने निवेदक भूषण सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूषण सावंत हे १६ वर्षे पत्रकार म्हणून देखिल कार्यरत असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी निवेदन करतात. सासोली येथे देखील नवरात्रौत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांनी उत्कृष्ट निवेदन केल्याने व्यासपीठावरील शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या हस्ते भूषण सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित जनसमुदायासमोर सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सासोली सरपंच बळीराम शेटये, माजी सभापती दयानंद धाऊसकर, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, माजी उपसरपंच लक्ष्मीकांत करमळकर, महिला दोडामार्ग तालुकाप्रमुख सौ. सानवी सुशांत गवस, सज्जन धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत, सुमित गवस, सुभाष गवस, अंकुश नाईक, अविनाश नाईक आदी उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स