ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पर्यावरणपूरक चित्रप्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

पर्यावरणपूरक चित्रप्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 03 May 2025 07:27 PM
वाचन संख्या 57

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते डॉ. नेत्रा सावंत, ज्येष्ठ चित्रकार श्री हरेकृष्ण भगवान आणि विश्राम भगवान यांच्या ‘नेत्रदत्त सृष्टीदर्शन’ या पर्यावरणपूरक चित्रांच्या सामूहिक प्रदर्शनाचे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे २ मे रोजी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील चित्रांतील संदेशाची प्रशंसा केली.

याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्यासह डॉ. जयेंद्र परुळेकर, राजेश नवांगुळ, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. उमेश मसूरकर, अच्युत सावंत भोसले, विक्रम भांगले या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला डॉ. दत्तात्रय सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोर्डेकर, स्वप्निल प्रभू आजगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, संतोष सावंत आणि प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स