ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!

ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!

ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!


Article image


विशेष | संपादकीय : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवणच्या अस्सल नाट्यपरंपरेला, वाॅटस ऍप डिजिटल माध्यमाद्वारे उजाळा देणारा एक 'वैभवशाली लेखन वाचन टप्पा' संपन्न झाला आहे. सुप्रसिद्ध वृत्त निवेदक ऋषी देसाई यांनी सुरू केलेल्या ‘नाटक मंडळी’ या व्हॉट्सॲप समूहावरील विशेष लेखन सदराने, १० जुलै २०२६ रोजी १०० भाग पूर्ण केले आहेत. मालवणच्या सांस्कृतिक सृष्टीत या उपक्रमाला एका ‘मैलाचा दगड’ म्हणून नक्कीच पाहिले जात आहे. 


दुर्लक्षित कलावंतांसाठी हक्काच्या 'सुचिंतन जाणीवेचे घर' बनलेल्या ‘नाटक मंडळी’ या समूहाच्या माध्यमातून, ऋषी देसाई यांनी सिंधुदुर्ग आणि मालवण भूमीतील रंगभूमीशी जोडलेल्या विविध कलावंतांचा परिचय करून देण्याचे काम (सपाटा) सुरू केले. यामध्ये पडद्यासमोरील चेहरे आणि पडद्यामागे राहून रंगभूमीची सेवा करणाऱ्या तसेच अबोल रसिकांसह अनेक अव्यक्त वाचक व्यक्ती घटकांना त्यांनी अफलातूनपणे बोलते केले आहे. या दरम्यान, समाजातील दुर्लक्षित प्रतिभावंत आणि विविध कलाक्षेत्रातील काही अनुल्लेखित व्यक्तिमत्त्वांची नव्याने ओळख करून देण्याचे काम हा सदराचा मूळ गाभा देखिल आवर्जून अबाधित राखला गेला आहे.  


या शतकीय टप्प्यानिमित्त नाट्यप्रेमी, रसिक आणि कलाकारांकडून ऋषी देसाई यांच्यावर आशिर्वादांसह प्रशंसेचा वर्षाव होत आहे. हे सदर माहितीचा संग्रह आहे आणि मालवणच्या नाट्य संस्कृतीचा इतिहास जागृत ठेवणारा सुदृढ ठेवा सुद्धा बनत आहे.


या सदराच्या पुढील प्रवासासाठी शंभरावा भाग म्हणजे या अनोख्या परिचय प्रवासाच्या कौतुकाची एक निर्मळ'आनंदवाडी' असून ती एक आनंदी संपन्नता आहे. या उपक्रमाने अनेक कलाकारांना एक हक्काचे आणि मुक्त 'मंडळ' मिळवून दिले असून, हा गौरवशाली प्रवास असाच अखंड सुरू राहो, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.


ऋषी देसाई यांच्या सदरातून दिवंगतांचे सुस्मरण होते सोबतच काही कारणास्तव स्वयंदुर्लक्षित झालेल्या व केलेल्या भाग्यवंतांना त्यांच्या स्वतःतील निसर्गदत्त प्रतिभेच्या जबाबदारीचे भान देखिल 'तळमळीने' समजावून सांगितले जाते हे ही निश्चितच प्रशंसनीय आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स