सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट पुस्तक लेख स्पर्धा.
सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट पुस्तक लेख स्पर्धा.
मसुरे | प्रतिनिधी : सम्यक संबोधी साहित्य संस्था, सिंधुदुर्ग तर्फे 'उत्कृष्ट पुस्तक लेख स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत तसेच सर्वोत्कृष्ट दहा लेखांचे संपादित पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंके यांनी दिली आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ₹ १०००, ₹ ७०० आणि ₹ ५०० तसेच स्मृतीचिन्ह, ग्रंथ असे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सहभागी स्पर्धकाने त्यांच्या आवडत्या कोणत्याही पुस्तकावर त्या पुस्तकाचे मर्म उलगडून दाखविणारा किमान १००० शब्दाचा लेख लिहिणे आवश्यक आहे. कथा, कादंबरी, कविता, नाटक, व्यक्ती चरित्र, आत्मचरित्र किंवा साहित्य प्रकारातील कोणताही भाषांतरीत ग्रंथ या विषयावरील ग्रंथावर लिहिलेल्या लेखनाचा पारितोषिकासाठी विचार करण्यात येणार आहे.
लेखन पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ असून प्रत्येक लेख स्वतंत्र पानावर टाईप करून पाठविणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पाठविलेल्या लेखाची संपादित ग्रंथासाठी निवड झाली असल्यास तो लेख युनिकोड मध्ये टाईप केलेला असावा, याची नोंद घ्यावी. लेख श्री. किशोर देऊ कदम, फ्लोरेट कॉलेज कणकवली, कणकवली कॉलेज रोड, नवीन पोस्ट ऑफिसच्या वरती, कणकवली - सिंधुदुर्ग, पिनकोड ४१६६०२, संपर्क क्रमांक 9422963655 येथे पोस्टाने किंवा पत्त्यावर पाठवावा अशी माहिती देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)