देऊळवाडा ( मराळवाडा) रानडे घरानजिकच्या पाणंद काॅक्रिटीकीरण कामाचा शुभारंभ.
माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा यशस्वी पाठपुरावा.
मालवण | प्रतिनिधी : मालवण सातेरी मंदिर पुल ते मराळवाडा यांना जोडणार्या रानडे घरानजीकच्या पाणंदीच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आश्विनी मराळ व विजया मराळ यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला.
माजी नगरसेविका पूजा करलकर यांनी या कामासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून सातेरी मंदिर ( देऊळवाडा – मराळवाडा ) येथील रानडे घरानजीकच्या पाणंदीच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर, विजया चव्हाण, मिलन मराळ, प्रमोद मराळ, दिव्या चव्हाण शुभांगी डुंबरे, दिव्या वीर, जागृती मराळ, प्रणिता मराळ, अश्विनी मराळ, तनुजा मराळ, गायत्री मराळ, शिल्पा मराळ, बाळा चव्हाण प्रणाली चव्हाण सुगंध वीर, निकिता आचरेकर, शितल मराळ, महेश हडकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)