ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
‘शिवाजी पार्क मैदानात पुतळा उभारण्याचा निर्णय…’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

‘शिवाजी पार्क मैदानात पुतळा उभारण्याचा निर्णय…’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

प्रकाशन: 29 Aug 2024 05:18 PM
वाचन संख्या 125

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे क्रिकेटविश्वातील मोठं नाव..या क्रिकेटपटूची सर्व जडणघडण शिवाजी पार्कच्या मातीत घडली. आज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं ते या मातीत घाम गाळून.. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकरला शिवाजी पार्कात क्रिकेटचे धडे दिले. याच मैदानात रमाकांत आचरेकर सरांकडून सचिनने क्रिकेटचे बारकावे शिकले. याच अभ्यासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवला. रमाकांत आचरेकर सर, शिवाजी पार्क आणि सचिन तेंडुलकर यांचं एक वेगळं नातं आहे. असं असताना याच शिवाजी पार्कात दिवंगत रमाकांत आचरेकर सरांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आनंदी झाला आहे. त्याने आपल्या भावना ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

‘आचरेकर सरांचा माझ्या आणि इतरांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच त्यांची इच्छा असेल. आचरेकर सरांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे.’, असं ट्वीट सचिन तेंडुलकर याने केलं आहे. रमाकांत आचरेकर यांनी फक्त तेंडुलकरच नाही तर प्रवीण अमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या दिग्गज खेळाडूंना घडवलं. हे सर्व खेळाडू भारतीय संघात खेळले आणि नावलौकिक मिळवला.

नगरविकास खात्याने जारी केलेल्या प्रस्तावानुसार, शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 5 येथे रमाकांत आचरेकर सर यांचे 6x6x6 आकाराचे स्मारक उभारलं जाणार आहे. या पुतळ्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुंबईच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्मारकाच्या बांधकामाची शिफारस केली होती. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2019 रोजी मुंबईत निधन झाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स