ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.

Article image

ब्यूरो न्यूज : कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

     

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, क्रीडा विभागाचे उप सचिव आबासाहेब कवळे, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे तसेच जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पाटणकर व पदाधिकारी ऋतुराज इंगळे, अभिजीत भोसले, मदन शेळके उपस्थित होते.

    

जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

    

करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील १२.७६ हेक्टर (३१.९० एकर) शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व संबंधित क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य कराराअंतर्गत हस्तांतरित करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व कोल्हापूर येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भाडेपट्टा करारनामा हस्तांतरणावर स्वाक्षरी केली.

    

बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC)च्या निकषांनुसार सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात आधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट व्यवस्था, क्रिकेट म्युझियम, खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी वाहनतळ, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थाही उभारण्यात येईल.

    

राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याच्या शासनाच्या संकल्पाला या प्रकल्पामुळे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळेल. या स्टेडियममुळे जिल्ह्यातील क्रिकेटला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

      

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स