ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

Article imageArticle image

सिंधुदुर्गनगरी : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

Article image

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे आयोजित भव्य योग कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, तहसीलदार गणेश लव्हे, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नगरसेवक - नगरसेविका मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध योग साधक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Article image

समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.


यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, भारताने जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. नियमित योगाभ्यासामुळे विविध आजारांपासून संरक्षण मिळते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते.


त्यांनी उपस्थितांना दररोज काही वेळ योगासाठी देण्याचे आवाहन करत निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश दिला. योगामुळे वैयक्तिक आरोग्याबरोबरच समाजाच्या आरोग्यदायी विकासालाही चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

Article image

नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनासाठी योग अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून स्वतः निरोगी राहावे आणि आपल्या कुटुंबासह समाजालाही निरोगी बनविण्यात योगदान द्यावे.”


कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे विविध योगासने सादर केली. योग दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करण्यात आला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालवण नगरपरिषद, स. का. पाटील महाविद्यालय, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न यावेळी करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स