ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
पुतळा बनवणाऱ्या आपटेला आम्ही आपटणार, आमदार नितेश राणेंचा सांगलीतून इशारा;
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पुतळा बनवणाऱ्या आपटेला आम्ही आपटणार, आमदार नितेश राणेंचा सांगलीतून इशारा;

प्रकाशन: 29 Aug 2024 04:42 PM
वाचन संख्या 223

सिंधुदुर्ग |

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 9 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरुन राजकीय नेतेमंडळी आमने-सामने आली आहे. राजकोट किल्ल्यावर बुधवारी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी आणि राणे पिता पुत्र एकत्र आल्यामुळे चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे आणि राणे पुत्र समोरासमोर आल्यामुळे तणाव वाढला होता. त्यावेळी, तेथे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्याही घटना घडल्या आहेत. याप्रकरणावरुन आता शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाला असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी, सुषमा अंधारे यांनी नितेश राणे आणि पुतळा बनवणाऱ्या आपटेचा फोटो दाखवला. आता, नितेश राणे यांनी पलटवार करत, आपटेला आम्ही आपटणार असल्याचं म्हटलं आहे.

सिंधुदुर्गमधील किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बनविणाऱ्या आपटे नावाच्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, आम्ही त्याला नक्की आपटणार, असे म्हणतनितेश राणेंनी (Nitesh Rane)पुतळा बनवणाऱ्या ठेकेदार आपटेला इशारा दिल आहे. विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहेत, महाराजांच्या गड किल्ल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या नेत्यांना विशाळगडवरील जिहाद्यांचे आतीक्रमने दिसली नाहीत का, असा सवालही नितेश रणेंनी विचारला आहे. नितेश राणे यांची आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) येथे रॅली काढण्यात आली आहे, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना इस्लामपूरचं नाव बदलणार असल्याचं म्हटलं.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावरुन आज सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, समितीने पुतळा पाहिला होता का, समितीने पुतळ्याला हिरवा कंदील दाखवला होता का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर कोण ते विद्वान होते ज्याला पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी, त्यांनी नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे एकत्रित फोटोही दाखवले आहेत. त्यानंतर, नितेश राणेंनी पलटवर करताना आपटेला आम्ही आपटणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

इस्लामपूरचं नाव आजपासून ईश्वरपूर

विशाळगडावर बुलडोझर घेऊन जाऊ आणि जिहाद्यांची आतिक्रमने काढून टाकू, आजपासून इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूरपूर म्हणा, जो म्हणत नाही त्याला पाकिस्तानमध्ये पाठवा, असेही नितेश राणे यांनी म्हटलं. त्यामुळे, एकाप्रकारे राणेंकडून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नामांतर ईश्वरपूर असंच करण्यात आलं आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स