ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भारताविरुद्ध युद्धाचे धाडस करु नका…!

भारताविरुद्ध युद्धाचे धाडस करु नका…!

प्रकाशन: 07 May 2025 09:13 AM
वाचन संख्या 314

ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरीकेचा पाकला इशारा…!’

ऑपरेशन सिंदूर ; मौलाना मसूद अझहरच्या मदरश्यावर
डागली क्षेपणास्त्र.

पाक व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त..!

लष्कर – ए – तोयबाचे अनेक वरीष्ठ नेते ठार.

ब्यूरो न्यूज : भारताने जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व मार्को रुबीयो यांचा पाकिस्तानला इशारा वजा सल्ला दिल्याचे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे भारतीय लष्कराने हल्ले केले. यामध्ये सर्वात मोठा हल्ला बहावलपूर येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं म्हटलंय, की “बहावलपूरचे संपूर्ण आकाश लालसर दिसत आहे. पोलीस आणि बचावपथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले आहेत. मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची पुष्टी झाली आहे.”

सोशल मीडियावर बहावलपूरमधील विध्वंसाचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत. एका युवकाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, “भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. माझ्या बहावलपूर शहरावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला आहे. मौलाना मसूद अजहरच्या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.”

हल्ल्यानंतर बहावलपूरमध्ये मदरसे रिकामे करण्यात आले असून मोठ्या संख्येने लोक रस्त्यांवर दिसून येत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक युवक म्हणतो, की सर्व मदरसे रिकामे करण्यात आले असून, मध्यरात्रीच अफवांचे वातावरण निर्माण झाले.

जैशचे मुख्यालय सुमारे २०० एकरमध्ये पसरलेले होते. ज्यात एक मशीद, शाळा, रुग्णालय, शेती फार्म आणि एक ट्रेनिंग कॅम्प होता. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे मुख्यालय संपूर्णपणे नष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूरसह पीओकेमधील मुजफ्फराबाद, कोटली, बाघ, मुरीदके, गुलपूर, महमूना, जोया आणि बिबर येथे भारतीय फाइटर जेट्सनी हल्ले केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला क्षेपणास्त्र हल्ला रात्री १२:३० वाजता करण्यात आला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा खात्मा झाला असून, हाफिज सईदचा मुलगा ताल्हा सईद याच्या नेतृत्वातील टॉप कमांडर्स मारले गेले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स