पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
पोईप | संजय माने ( प्रतिनिधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ पोईप खालची पालववाडी आणि सध्या मुंबईतल्या जोगेश्वरीतील रत्नागिरी जिल्हा मुंबई ज्ञाती समाज संचलित RJMDS प्रशालेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या कु. अक्षर रमाकांत पालव यानं ८ व्या वर्ल्ड गोजू - रियू कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन रौप्य पदकं तथा सिल्वर मेडल्स आणि एक कांस्य पदक तथा ब्राॅन्झ मेडल पटकावले आहे. ही स्पर्धा ५ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यातील म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स, बालेवाडी स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये खेळवली गेली. या भव्य जागतिक स्पर्धेचे आयोजन 'इंडियन गोजू रियू कराटे डो असोसिएशन' (IGKDA) द्वारे करण्यात आले होते.
वर्ल्ड गोजू - रियू कराटे फेडरेशन (WGKF) दर दोन वर्षांनी या जागतिक स्पर्धेचे आयोजन करते. २०२४ मध्ये ही स्पर्धा ऑस्ट्रियात झाली होती, त्यानंतर २०२६ मध्ये याचे यजमानपद भारताला मिळालं. या चॅम्पियनशिपमध्ये जगभरातील शेकडो खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांचा सहभाग होता.
या स्पर्धेत लहान मुलांपासून ते १८ वर्षांवरील प्रौढ वयोगटातील खेळाडूंसाठी विविध वजनी गटात 'काता' आणि 'कुमिते' या प्रकारच्या चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमुळे उदयोन्मुख कराटे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट तंत्रज्ञान, शिस्त आणि कौशल्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाली अशी प्रतिक्रिया कु. अक्षर रमाकांत पालव याने व्यक्त केली आहे.
कु. अक्षर रमाकांत पालव यानं यापूर्वी नवव्या एशिया गोजू रियू चॅम्पियन शिप स्पर्धेत सुवर्णपदक तथा गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि आता टीम कुमिते मध्ये सिल्वर मेडल, टीम काता - सिल्वर मेडल व काता मध्ये ब्राॅन्झ मेडल मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नांव चमकवल्याबद्दल कु. अक्षर पालव आणि त्याचे प्रशिक्षक भीमराव पवार व धीरज पवार आणि पालकांचे तसेच त्याच्या प्रशालेचे देखिल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. कु. अक्षर रमाकांत पालव पासून प्रेरणा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक मुले शालेय वयात क्रीडा क्षेत्रात तंत्रशुद्ध शिस्तबद्ध पद्धतीने अग्रेसर होत रहातील अशा सदिच्छापर प्रतिक्रिया अनेक क्रीडा तज्ञांनी दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो ...
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत...
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर म...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या