ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बुमराहबाबत टिप्पणी इशा गुहाला भोवली …!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बुमराहबाबत टिप्पणी इशा गुहाला भोवली …!

प्रकाशन: 16 Dec 2024 01:20 PM
वाचन संख्या 270

क्रीडा | ब्यूरो न्यूज : सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बोर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर होता परंतु भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची विशेष प्रशंसा होत आहे. याच दरम्यान २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या ‘मंकीगेट’ या वांशिक टिप्ीची पुनरावृत्ती झाली. या सामन्यादरम्यान महिला समालोचक इसा गुहाने जसप्रीत बुमराहबाबत वक्तव्य त्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर काही ठिकाणी तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

इशा गुहा ( क्रिकेट समालोचक व माजी महिला कसोटीपटू, इंग्लंड )

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने यजमान संघाच्या सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले, परंतु ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने पाहुण्यांना लवकर आघाडी मिळवून दिली. कॉमेंट्री करताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्याचे खूप कौतुक केले. फॉक्स क्रिकेटसाठी कॉमेंट्री करताना तो म्हणाला, ‘आज बुमराहने ५ ओव्हरमध्ये ४ रन्स देऊन २ विकेट घेतल्या. ब्रेट लीसोबत कॉमेंट्री करत असलेल्या इंग्लंडची माजी क्रिकेटर इशा गुहा हिने माजी कसोटीपटू ब्रेट लीशी बोलताना म्हणले की, ‘ बुमराह एमव्हीपी आहे, म्हणजे प्राइमेट बरोबर ना…?”

क्रिकेटच्या मैदानात किंवा कोणत्याही खेळाच्या मैदानात एमव्हीपीचा अर्थ ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ असा होतो, इसा गुहा हिने त्याचा अर्थ सांगताना बुमराहसाठी ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट’ हा शब्द वापरला. ज्याचा अर्थ ‘ मोठ्या बुद्धीचा माकड’ असा होतो. आता या कमेंटनंतर इशा गुहा मोठ्या वादात अडकली आहे. ही टिप्ी इशा गुहाला चांगलीच भोवली असल्याचे मत व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स