मॅक्स ….रिलॅक्स…!
ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त..!
क्रीडा : ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आज, सोमवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेटमध्ये उपलब्ध राहणार आहे.
ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. त्याने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास ४ हजार धावा केल्या असून ७९ बळी घेतले आहेत. मॅक्सवेल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएल २०२५ मध्ये दिसला होता मात्र दुखापतीमुळे काही सामन्यांनंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला.
निवृत्तीबाबात मॅक्सवेलने मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीला आधीच कल्पना दिली होती. फेब्रुवारी – मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, मॅक्सवेलने सांगितले होते की तो २०१७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळू शकणार नाही.
मॅक्सवेलने, एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, त्यावेळी त्याला सांगितले होते की ‘मला वाटत नाही की मी हे करू शकेन (२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळेन).” एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने ४ शतके आणि २३ अर्धशतकांसह ३.९९० धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च २०१ ही धावसंख्या असून ती एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वकालीन महान खेळींपैकी एक आहे असे मानले जाते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)