ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा ; आ. वैभव नाईक यांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी.

मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा ; आ. वैभव नाईक यांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी.

प्रकाशन: 29 Aug 2024 05:42 PM
वाचन संख्या 103

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : पोलिसांसमोरच नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली असून त्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

     आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,  काल गुरुवार दि.२८/०८/२०२४ रोजी  मालवण राजकोट किल्ल्यावरील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला  रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली. या आधी सुद्धा  माझे काका कै. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. तेव्हा नारायण राणे हे तेरावे आरोपी होते,  त्यांची गुन्हेगारी  पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स