ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची घेतली सदिच्छा भेट.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची घेतली सदिच्छा भेट.

प्रकाशन: 08 Nov 2023 01:10 AM
वाचन संख्या 166

मुंबई | ब्यूरो न्यूज : भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक भारत भेटीवर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ७ नोव्हेंबरला सायंकाळी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची हॉटेल ओबेरॉय येथे सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव जयश्री भोज आदींसह राज्य शासन आणि भूतानचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांना गणेश मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सदिच्छा सत्कार केला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भूतानचे राजे जिग्मे वांगचूक यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्र आणि भूतान यांच्यात सांस्कृतिक वारसा समान आहे. दरवर्षी अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांना भूतानचे पर्यटक भेट देतात, तर महाराष्ट्रातील पर्यटकांचे भूतान हे आवडीचे ठिकाण आाहे. भूतानमध्ये गुंतवणूक आर्थिक प्रकल्पांना चालना देण्यासाठी विशेष प्रशासकीय क्षेत्र कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होतील.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भूतानबरोबरचे संबंध आणखी वृद्धिंगत होतील. तसेच भूतानबरोबरील परस्पर हिताचे आणि द्विपक्षीय सहकार्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार भूतानला सर्व सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स