सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ जिल्हाध्यक्षपदी प्रसाद कुबल यांची निवड.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाची जिल्हा कार्यकारिणी निवड सभा कुडाळ हायस्कूल, कुडाळ या ठिकाणी संपन्न झाली. या सभेमध्ये श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट, तालुका- मालवण या प्रशालेतील श्री. प्रसाद कुबल यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बॅ. नाथ पै. विद्यालय, कुडाळचे श्री. धोंडी गावडे यांची जिल्हा कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीची निवड सभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. औदुंबर भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेमध्ये कार्यकारिणी निवडीसाठी निरीक्षक म्हणून श्री. वामन खोत यांनी काम पाहिले. या सभेत सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची २०२५-२०२८ या कालखंडासाठी निवड करण्यात आली.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद कुबल (श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट ता. मालवण) कार्यवाह श्री. धोंडी गावडे (बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ) जिल्हा परीक्षा प्रमुख श्री. महेश चव्हाण (स. का. पाटील विद्यामंदिर केळूस) सहाय्यक परीक्षा प्रमुख श्री. चाळोबा हरगुडे (श्री सरस्वती विद्यालय आरवली टांक) व श्री. धनाजी भोसले (शोभना नारायण विद्यालय, नानिवडे) उपाध्यक्ष श्री. सुशीलकुमार कडुलकर (कुडाळ हायस्कूल कुडाळ), श्री. रामचंद्र भानुसे (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी) श्री. प्रसाद पारकर (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) सहकार्यवाह श्री. नागेश विरकर (भ.ता. चव्हाण म.मा. विद्यालय, चौके) श्री. भाग्येश कदम (न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट) श्री. संतोष मेथे (कीर्ती विद्यालय, घोटगेवाडी) महामंडळ प्रतिनिधी श्री. भाऊसाहेब चवरे. (श्री भाई साहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव) श्री. राजाराम फर्जंद (माध्यमिक विद्यालय, सोनावल). कुडाळ तालुकाध्यक्ष- श्री. विद्यानंद पिळणकर (शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव) कार्यवाह – विलास राठोड (लिंगेश्वर विद्यालय तुळसुली) मालवण तालुकाध्यक्ष- श्री. मिलिंद शिरोडकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण) कार्यवाह – श्री. अभिजीत धुरे (जनता विद्यामंदिर त्रिंबक) सावंतवाडी तालुका अध्यक्ष- श्री. दशरथ श्रृंगारे (राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी ) कार्यवाह – श्री. रोहन पाटील (कै. बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालय, दाणोली ) वेंगुर्ला तालुका अध्यक्ष- श्रीमती सविता जाधव, (रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ले) कार्यवाह- संदीप तुळसकर (श्री शिवाजी हायस्कूल तुळस) कणकवली तालुका अध्यक्ष – श्री. संदीप नागभिडकर (विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली) कार्यवाह- श्री. सतीश तवटे (शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव) देवगड तालुका अध्यक्ष- श्री. शिवाजी ढाकणे (अनंत केळकर स्कूल, वाडा) कार्यवाह – श्री. रमेश कविटकर (डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल मुटाट) वैभववाडी तालुका अध्यक्ष- श्री. संदीप शिंदे (अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी) कार्यवाह-श्रीमती दीपा भरडकर (माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे ) दोडामार्ग तालुकाध्यक्ष- श्री. अरुण सावंत (माध्यमिक विद्यालय माटणे ) कार्यवाह-विष्णूदास नाईक (माध्यमिक विद्यालय झरेबांबर) व जिल्हा सल्लागार – माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. औदुंबर भागवत (शिवडाव माध्यमिक विद्यालय) श्री. वामन खोत (भंडारी एज्यू. सोसायटी हायस्कूल मालवण) व माजी अध्यक्ष श्री. तुकाराम पेडणेकर (श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे) या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीस महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)