ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
स्मार्ट ग्राम योजना.

स्मार्ट ग्राम योजना.

प्रकाशन: 08 Jul 2025 11:27 PM
वाचन संख्या 56

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती.

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : ग्राम विकास व जल संधारण विभागाकडील शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्मार्ट ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये योजनेच्या अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. प्रती तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतींना १० लक्ष व जिल्हा सुंदर गाव ग्रामपंचायतींना ४० लक्ष पारितोषिकाची रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) यांनी दिली आहे.

स्मार्ट ग्राम निवडीसाठीचे निकष :
SANITATION (स्वच्छता), MANAGEMENT (व्यवस्थापन), ACCOUNTABILITY (दायित्व), RENEWABLE ENERGY & ENVIRONMENT (अपारंपारीक उर्जा व पर्यावरण), TRANSPARENCY & TECHNOLOGY (पारदर्शकता व तंत्रज्ञान)
वरील निकषांची पूर्तता करीत असलेल्या सन २०२३-२४ अंतर्गत निवड झालेल्या आर.आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे:- तालुका कुडाळ मधून निरुखे ग्रामपंचायत, मालवण मधून वराड ग्रामपंचायत, देवगड मधून बापर्डे ग्रामपंचायत, वेंगुर्ला मधून पालकरवाडी ग्रामपंचायत व परबवाडा ग्रामपंचायत (विभागून), दोडामार्ग मधून मणेरी ग्रामपंचायत, कणकवली मधून तरंदळे ग्रामपंचायत, वैभववाडी मधून उपळे ग्रामपंचायत, सावंतवाडी मधून वेत्ये ग्रामपंचायत व आरोंदा ग्रामपंचायत (विभागून) तसेच तुळसुली कर्याद नारुर ता. कुडाळ या ग्रामपंचायतीची तालुका स्पर्धेत सन २०२१-२२ मध्ये आर. आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव म्हणून निवड करण्यात आली होती.
त्यामुळे ग्रामपंचायत सन २०२३-२४ च्या तालुका सुंदर गाव स्पर्धेसाठी पात्र ठरली नाही, मात्र शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरते. या सर्व ग्रामपंचायतींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली त्यामधून जिल्हा सुंदर गाव स्पर्धेत जास्त गुणांकन मिळवुन तुळसुली कर्याद नारुर ता. कुडाळ ही ग्रामपंचायत सन http://localhost/news/public/uploads/2023-24 साठी आर.आर (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी घोषित केले तसेच तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.

“स्मार्ट ग्राम पुरस्कार” योजनेअंतर्गत आर. आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव व आर आर (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव म्हणून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचयातींना पारितोषिक प्राप्त रकमेतून खालील नाविन्यपूर्ण कामे करण्याबाबत परवानगी देण्यात आलेली आहे. अपारंपारीक उर्जा संबधी अभिनव प्रकल्प,स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प, महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकुल प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे (GIS), आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्वे, संकलन आणि तपासणीसूची तयार करुन दर्जा वाढवण्यासाठी (ISO) प्रकल्प राबवणे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स